शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत खून प्रकरण : पतीनेच केला खून, किरकोळ भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:38 IST

शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा वॉचमन धुरूपसिंग झपटसिंग कुमाल याची पत्नी लक्ष्मी (२९) यांचा नैसगिक मृत्यू झाला की हत्या झाली अशी चर्चा कर्जतमध्ये होती. चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्या महिलेचा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडणातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

कर्जत : शहरातील मानस कॉम्प्लेक्सचा वॉचमन धुरूपसिंग झपटसिंग कुमाल याची पत्नी लक्ष्मी (२९) यांचा नैसगिक मृत्यू झाला की हत्या झाली अशी चर्चा कर्जतमध्ये होती. चार दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्या महिलेचा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडणातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता कर्जत पोलिसांना मानस कॉम्प्लेक्सच्या एका खोलीत एक महिला जखमी अवस्थेत पडली आहे असा दूरध्वनी आला. या कॉम्प्लेक्स खोलीमध्ये धुरूपसिंग कुमाल आणि त्याची पत्नी लक्ष्मी आपल्या दोन मुलांसह राहत होती. पोलिसांना घटनास्थळी लक्ष्मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. तिच्या बाजूला एक लोखंडी मांडणी पडली होती त्यामुळे हा घात की अपघात असा प्रश्न पोलिसांना पडला होता.ही घटना नक्की कशामुळे घडली यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक अशोक ठाकूर, सहायक पोलीस अजित शिंदे , पोलीस उपनिरीक्षक आर. आर. आडगळे, सहायक फौजदार एस. एस. राजमाने, नितीन अहिरे, सदाशिव शिंदे, रोहित मोरे, दशरथ मोकल, प्रशांत देशमुख, शैलेश कदम, रमेश दोरताले, सचिन व्हसकोटी, सागर नायकुडे आदींचे पथक घटनास्थळी पोहचले. अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.पोलिसांच्या तपासात लक्ष्मीचा पती धुरूपसिंग कुमाल याच्याकडे चौकशी केली असता आपली पत्नी लक्ष्मी हिच्या डोक्यावर घरातील साहित्य ठेवलेली लोखंडी मांडणी पडली व त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा अशी दिशाभूल करणारी माहिती दिली होती. तसेच ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी मी स्टेट बँक आॅफ इंडिया कर्जत शाखेतमध्ये पैसे भरण्याकरिता गेलो असल्याचे सांगितले. कुमाल प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विश्वास न ठेवता वेगळ्या दिशेने फिरवली आणि त्यांनी शहरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज जमा करून त्याचा अभ्यास केला. सुमारे शंभरहून अधिक नागरिकांकडे तपास केला. त्यावरून स्वत:चा बचाव करणाºया धुरूपसिंग कुमाल याची चौकशी केली असता त्यानेच पत्नीचा खून केला आहे हे पोलिसांच्या लक्षात आले.शुक्रवारी पाचव्या दिवशी तशी कबुली त्याने दिली. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून