शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने कळंबोली जलमय

By वैभव गायकर | Updated: July 7, 2024 15:45 IST

पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही.

पनवेल - शनिवारी मध्यरात्रीपासुन सुरु असलेल्या जोरदार पावसाचा सर्वात जास्त परिणाम कळंबोली शहरात पहावयास मिळाला. रविवार दि.7 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कळंबोली शहरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी पाण्याखाली गेल्या होत्या.

काही तासातच पनवेलमध्ये 121 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा योग्य रित्या होऊ शकला नाही. त्यामुळे कळंबोली शहरात अनेक भागात पाणी साचल. केएल 2,4,5,6, आदींसह सेक्टर 1,2,4,5,6 बिमा कॉम्प्लेक्स ते कळंबोली पोलीस ठाणे परिसरात पाणी साचले. काही घरात देखील पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाल. कळंबोली मधील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावर एनएमएमटी,बेस्ट च्या बस बंद पडल्या याचाच परिणाम वाहतुकीवर झाला. बस बंद पडल्याने या रस्त्यावरील चार चाकी गाड्या देखील पाण्यात अडकल्या.

शहरात  50 दुचाकी, 25 चारचाकी पाण्याखाली गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.पावसाचा जोर 12 च्या सुमारास कमी होत गेल्याने साचलेले पाणी हळू हळू ओसरले.दरम्यान शहरात अर्धवट नालेसफाई व पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतलेल्या विकासकामांमुळे हि परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला.सत्ताधारी भाजपवर भगत यांनी यावेळी आरोप केले.

शहरात अनेक रस्त्याची आणि गटारांची कामे सुरु आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे हाती घेतल्याने शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली. या कामांचे टायमिंग चुकल्याची देखील चर्चा आहे. होल्डिंग पॉडमधील गाळ न काढल्यामुळे देखील पॉडची पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने देखील शहरातील पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम झाले.

2005 ची आठवण ताजी -2005 च्या महापुराचा सर्वात जास्त फटका कळंबोली शहराला बसला होता.रविवारच्या पावसाने अनेक घरात पाणी शिरल्याने 2005 ची आठवणी ताज्या झाल्या असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

सीईटीपीचे दूषित पाणी रस्त्यावर -तळोजा एमआयडीसी मध्ये देखील विविध ठिकाणी यावेळी पाणी साचले होते.एमआयडीसी मधील दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाते.या सीईटीपी केंद्रात देखील पाणी साचल्याने पूर्ण दूषित पाणी रस्त्यावर आले होते.

चार ते पाच तासातच 121 मिमी पाऊस पनवेल परिसरात पडले.त्यातच समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याने कळंबोलीत ही समस्या उद्भवली. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. होल्डिंग पॉण्डची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गाळ काढण्यात येईल.- मंगेश चितळे (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेलRainपाऊस