शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अनधिकृत भरावासाठी जेएसडब्ल्यू कं पनीला पाच कोटी ३७ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 01:58 IST

सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने दहा शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीमध्ये मातीचा भराव (राखेचा स्लॅक) करणे महागात पडले आहे. या प्रकरणी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवर यांनी कंपनीला तब्बल पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तब्बल सात महिने उलटून गेली तरी अद्याप त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले नाही.मौजे शहाबाज येथील ग.नं. ६१८/०, ७९६/०, ६९७/०, ५२२/अ, ५१०/०, ७२०/०, ७१८/०, ७१७/०, ७१४/० आणि ७८८/० या मिळकतीमध्ये जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने कंपनीतून निघणाºया मातीचा (राखेचा स्लॅक) भराव विनापरवाना केला असल्याचे दिसून येते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार केली होती. शेतकºयांच्या तक्र ारीनुसार तसेच शहाबाज तलाठी यांच्या अहवालानुसार प्रांत कार्यालयामध्ये फौजदारी संहिता कलम १३३ नुसार ३० मार्च २०१९ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने त्यानंतरची सुनावणी ९ एप्रिल २०१९ रोजी लावण्यात आली होती. दरम्यान, प्रांताधिकाºयांनी १ एप्रिल रोजी कंपनीला दंड ठोठावण्यात आल्याची नोटीस काढली.सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे. मातीच्या उत्खननाची दंडाची रक्कम बाजारमूल्याच्या पाचपट म्हणजेच प्रति ब्रास २४९० होती. त्यानुसार जेएसडब्ल्यूने विनापरवाना केलेल्या एकूण २१ हजार ५८७ ब्रास मातीसाठी एकूण पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला बजावले होते. त्यानंतर दोन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही कंपनीने दंडाची रक्कम भरली नसल्याचे प्रातांधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या प्रकाराला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत. परिसरातील प्रदूषण आणि पर्यावरणाची कोणालाही चिंता नाही. शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. राखेच्या प्रदूषणामुळे शेती करणे आता शक्य होत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. जलस्रोत प्रदूषित झाल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपनीविरोधात यापुढे थेट फौजदारी गुन्हेच दाखल करणे गरजेचे आहे, असे शहाबाजचे ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू कंपनीने दहा शेतकºयांच्या खासगी शेत जमिनीमध्ये बेकायदा भराव केलेला आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीला या प्रकरणी पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. या प्रकरणाच्या सुनावण्या आता पूर्ण होऊन प्रकरण निकालावर ठेवण्यात आले आहे.- शारदा पोवार,प्रांताधिकारी, अलिबाग

टॅग्स :Raigadरायगड