शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जेएनपीटी करणार वीजनिर्मिती, सेझ प्रकल्पासाठी  ५० कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 00:56 IST

JNPT : जेएनपीटीने २७७ हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक सेझ प्रकल्प निर्मितीचे काम सुरू केले आहे.

उरण : जेएनपीटीत उभारण्यात येत असलेल्या सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ५० मेगावॉट वीजनिर्मितीचे सबस्टेशन उभारण्यात येत आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत हे सबस्टेशन कार्यान्वित होणार आहे. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनमुळे सेझमधील व्यावसायिकांना अगदी कमी दरात वीजपुरवठा करणे शक्य होणार असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.जेएनपीटीने २७७ हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक सेझ प्रकल्प निर्मितीचे काम सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या सागरमाला योजनेतून सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या जेएनपीटी सेझ प्रकल्पाच्या पायाभरणीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ मध्ये झाले आहे. नव्याने सुरू होण्याच्या मार्गावर असलेले नवी मुंबई एअरपोर्ट, डीएफसी रेल कॉरेडाॅर, ट्रान्स हार्बर लिंकशी हा अत्याधुनिक सेझ प्रकल्प जोडला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या जेएनपीटी सेझमध्ये देशी-विदेशी कंपन्यांकडून हजारो कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच, सुमारे सव्वा लाख रोजगारही उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या जेएनपीटी सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी जेएनपीटीमार्फतच ५० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येत आहे.त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. फक्त जेएनपीटी सेझ प्रकल्पासाठीच पहिल्यांदाच ओव्हर हेड लाइनचा वापर करून वीजनिर्मिती केंद्र उभारत आहे. .

५० मेगावॉट वीजनिर्मितीकोरोनामुळे हे सबस्टेशन उभारणीचे काम लांबणीवर पडले होते. मात्र सध्या जलदगतीने सुरू असलेल्या कामामुळे सबस्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे सेझ प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र ५० मेगावॉट वीजनिर्मितीचे सबस्टेशन येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होईल, असा विश्वास जेएनपीटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अखंडित वीजपुरवठा सबस्टेशनमुळे सेझमधील व्यावसायिकांना १२ ते १३ रुपये प्रति युनिट इतक्या कमी दरात वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच वीजपुरवठा अखंडित राहणार .

टॅग्स :JNPTजेएनपीटी