शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

काशीद येथील जेट्टीचे काम 60 टक्के पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:54 IST

सागरमाला योजनेअंतर्गत ११० कोटी रुपये खर्च : दोन तासांत मुंबई गाठता येणार

संजय करडेलोकमत न्यूज नेटवर्क मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत ११० कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य जेट्टी बांधण्याच्या वेग प्राप्त केला असून सन २०२१ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. जलवाहतुकीने केवळ दोन तासात मुंबई येथून काशीद गाठता येणार आहे. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारा हे ठिकाण आंतराष्ट्रीय ठिकाणात समाविष्ट झाल्याने येथे दरवर्षी देशी-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी वर्षाला ७ लाखांपेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. सध्या काशीद येथे येणारे पर्यटक मुंबई येथून मांडवा व वाहनाने अलिबाग मार्गे काशीद या ठिकाणी पोहोचत असतात. काशीद समुद्रकिनारी सुट्टीच्या दिवसात किमान एका दिवसाला १० हजारपेक्षा जास्त पर्यटक येत असतात. मुंबईहून काशीदला येताना प्रवासात किमान तीन तास वाया जात होते. प्रवासाचे अंतर कमी व्हावे व मुंबईतील पर्यटकांना थेट काशीद या ठिकाणी रो-रो सेवा अथवा पॅसेंजर जेट्टीद्वारे जलद गतीने पोहचता यावे यासाठी २०१८ साली केंद्र सागरमाला योजनेअंतर्गत काशीद येथे मोठी जेट्टी विकसित करण्यासाठी मान्यता मिळून निधीही प्राप्त झाल्याने काम जलद गतीने पूर्ण करण्याचा इरादा आहे.

रो रो सेवेसाठी खोल समुद्रात टे-टे-स्पॉर्ट अंथरण्यात येतात. त्याची सुयोग्य मांडणी केली जाते आहे. सिमेंट काँक्रिटचे टे-टे-स्पॉर्ट बनवण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचा थर समुद्रात टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. मे अखेर पर्यंत टे-टे-स्पॉर्टचे काम पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. टे-टे-स्पॉर्ट अंथरून झाल्यावर पुढील काम जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. काशीदच्या सुंदर किनाऱ्यावर पर्यटकांना जाता यावे, यासाठी त्या ठिकाणच्या समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी २०१८ ला आवश्यक ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला पाठविण्यात आला होता. त्याला केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प काही काळ रखडला होता. 

मुरुड तालुक्याला होणारे फायदे 

nमुंबई प्रवासाचे अंतर वाचणारnस्थानिकांना मोठा रोजगार प्राप्त होणारnऑटो रिक्षा अथवा मिनी डोअर यांचा थांबा तयार होऊन मुरुडकडे येण्याची व्यवस्था झाल्याने रिक्षा चालकांच्या रोजगारात वाढ होणारnप्रवासाचे अंतर कमी झाल्याने मुरुड समुद्र किनारी असणाऱ्या हॉटेल लॉजिंग यांना मोठा फायदा होणारnसमुद्रकिनारी विविध टपरीधारक पर्यटकांना सुविधा देणाऱ्यांच्या व्यवसायात वृद्धी होणारnमुंबई काशीद दोन तासांचे अंतर त्यामुळे प्रवासाचे तास वाचणारnऔद्योगीकरणाला मोठी चालना मिळून बेरोजगारीचे प्रमाण घटण्यास मदत होणारnथेट काशीद गाठता आल्याने पर्यटकांचे प्रवासाचे तास वाचणार

काशीद येथील ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्यासाठी सन २०१८ साली सागरमाला योजनेअंतरंगत केंद्राकडून ११२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. काशीद जेट्टीचे काम सध्या आतापर्यंत किमान ६० टक्के पूर्ण झाले आहे. संबंधित ठेकेदाराने बारशीव येथे सिमेंट काँक्रिटचे टे-टे-स्पॉर्ट बनवल्यामुळे कामाचा कालावधी कमी होण्यास मदत झाली आहे. सन २०२१ अखेर अथवा सन २०२२ च्या मार्च महिन्यापर्यंत या  जेट्टीचे काम पूर्ण झालेले असणार आहे.                                                                                        

- सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड

 

टॅग्स :Raigadरायगड