शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, जयंत पाटील यांचा मनोदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 03:16 IST

टांझानिया देशात उद्योग सुरू करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याची किमया शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

अलिबाग : एका छोट्याशा खेड्यात प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करून आज थेट टांझानिया देशात उद्योग सुरू करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याची किमया शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. समाजकारण, राजकारण, सहकार अशा क्षेत्रात आपल्या कामाची छाप सोडतानाच परदेशात त्यांची एक यशस्वी उद्योजक अशी ओळख आहे. अलिबाग ते टांझानिया असे यशोशिखर गाठताना त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेले अनुभव जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, सचिन इटकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून उलगडले.जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सांस्कृतिक कला विकास मंडळ व सेंटर फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडियाच्या वतीने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी संमेलनात आमदार पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. अलिबागमध्ये प्रिंटिंग प्रेसचा पहिला व्यवसाय सुरू केला. परदेशात गेल्यानंततर क्रुझ, जलवाहतूक पाहून असे वाटायचे आपण समुद्राचा खरा उपयोग करतच नाही. नितीन गडकरी आणि माझ्यात साम्य आहे, आम्हाला व्यवसायाच्या संधी लगेच ध्यानात येतात. त्यामुळेच अलिबाग ते मुंबई प्रवासासाठी पहिली कॅटामरॅन आणली. त्या वेळी सात कोटींचे ते जहाज आॅस्ट्रेलियातून आणले होते. मात्र, भारत आणि आॅस्ट्रेलियातील समुद्रात मोठा फरक आहे. आपल्याकडे असलेल्या समुद्रातील कचऱ्यामुळे बोटीचे इंजिन वारंवार बंद पडायचे. त्या समस्येवर उपाय शोधला. सहा महिन्यात केवळ ६०० लोकांनीच या बोटीने प्रवास केला. मात्र, आज दररोज दहा हजार लोक या सुविधेचा लाभ घेतात. जलवाहतूक सुरू केल्यामुळे अलिबागचा चेहरा-मोहरा बदलला आहे. पर्यटन व्यवसाय फोफावला आहे. येणाºया काळात अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प आहे, असे पाटील म्हणाले.सातासमुद्रापार व्यवसाय करण्याची जिद्द होती. त्यातून दुबईत व्यवसाय केला. व्हिएतनाममध्ये बंदर विकासासाठी जागा मिळाली आहे. मागास किंवा विकसनशील देशांपेक्षा विकसित राष्ट्रांमध्ये व्यवसाय करणे सोपे आहे. मात्र, आमचे व्याही सतीश टकले एकदा टांझानियाला गेले. तेथील माहिती मिळाल्यानंतर आफ्रिकन गरीब देशांमध्ये व्यवसाय उभा करण्याचा निश्चय झाला आणि टांझानियाला गेल्या आठ महिन्यांत ५०० एकरात ऊस उभा केला. पुढील काही महिन्यांत उसाचे पीक हाती येताना तिथे साखर कारखाना उभा करणार आहे. तिथल्या सरकारने दहा हजार एकर जागा ऊस लागवडीसाठी देऊ केली आहे. पुढील दीड वर्षात तिथे ऊस लावणार आहे. टांझानियात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा आमचा कारखाना असेल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला. टांझानिया हा देश म्हणजे ५० वर्षांपूर्वीचा भारत आहे. मात्र, तेथील स्वच्छता, शिस्त, गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे, असेही ते म्हणाले.