शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बराल पती-पत्नीला गाडीखाली चिरडून पलायन केलेल्या आरोपी जय घरत याला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 18:12 IST

उरण रेल्वे स्टेशनसमोरच मागील महिन्यात पवित्रा, रश्मिता हे बराल दांपत्य आणि मुलगी परी बराल यांच्या स्कुटीला क्रेटा कारने चिरडून आरोपी जय दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता.

मधुकर ठाकूर 

उरण : पनवेल सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्याने ,उच्च न्यायालयातही जामीन अर्ज मागे घेण्याच्या नामुष्कीची पाळी आल्यानंतर आणि विविध सामाजिक संस्थांच्या पोलिसांवरील वाढत्या दबावतंत्रानंतर उरणमधील अत्यंत संवेदनशील बनलेल्या बराल पती-पत्नी अपघात प्रकणातील आरोपी जय चंद्रहास घरत याला पोलिसांनी उरण परिसरातून अटक केली आहे.न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी डॉ.विशाल नेहूल यांनी दिली.

उरण रेल्वे स्टेशनसमोरच मागील महिन्यात पवित्रा, रश्मिता हे बराल दांपत्य आणि मुलगी परी बराल यांच्या स्कुटीला क्रेटा कारने चिरडून आरोपी जय दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी मदतीसाठी धाऊन आलेल्या आरसीएफ जवान अतुल चौहान यांनाही उद्दामपणाने अश्लील भाषेत शिवीगाळ, मारहाण करून भाजपा आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती चंद्रहास घरत यांचा आरोपी मुलगा जय हा घटनास्थळावरूनच वाहतूक पोलीसांच्या उपस्थितीतच परिचित सहकाऱ्यांच्या मदतीने दुचाकीवरून फरार झाला आणि उपचाराच्या नावाखाली उलव्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता.दरम्यान भाजपा आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती चंद्रहास घरत यांचा आरोपी हा मुलगा असल्यानेच उरण पोलिस कारवाई करण्यात चालढकलपणा करीत असल्याची गंभीर आरोप करताना उरण- पनवेलमधील काही सामाजिक संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन 

आरोपीला अटक करून कारवाई करण्याची मागणी केली होती.मागणीचा सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी  सातत्याने पाठपुरावाही केला. दरम्यान आरोपीने जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जाला पोलिसांनी कडाडून विरोध केला.यामुळे  पनवेल सत्र न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळून लावला.त्यानंतर उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज आरोपीच्या वकिलांनी मागे घेण्याची नामुष्की ओढवली.त्यामुळे पोलिसांचा आरोपीला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर बुधवारी (१) सकाळी ८ वाजता उरण पोलिसांनी आरोपी जय घरत याला उरणमधुन अटक केली.न्यायालयानेही आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी डॉ.विशाल नेहूल यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी