शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भाजपा सरकारच्या काळात जगणे महाग, मरण स्वस्त - मोहन प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 19:10 IST

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे.

रायगड - भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे.

राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनआक्रोश सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहातील दुस-या जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन महाड येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी शक्तींच्या इशा-यावर देश चालवत असून गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्यांनी कररूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रूपये आपल्या उद्योगपती मित्रांना वाटले. शाह आणि तानाशाहांची जोडी देशाला लुटण्याचे काम करीत आहे असा टोला त्यांनी लगावला. राज्यात बारा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतरही आत्महत्या केल्या आहेत. याला सरकार जबाबदार असून काँग्रेस कार्यकर्ते भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत', असं मोहन प्रकाश बोलले आहेत.

अशोक चव्हाण यावेळी  बोलले की, 'गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सत्तेत बसलेल्या लोकांना जनतेचे प्रश्नांची उत्तरे सोडा प्रश्नही माहित नाहीत या सरकारला चले जाव असे सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. राज्यातील 12 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी सरकारला लाज कशी वाटत नाही ? असा सवाल खा. चव्हाण यांनी केला. सरकारची कर्जमाफी फसवी असून कर्जमाफीतून मत्स्यव्यावसाय करणा-या शेतक-यांना वगळून कोकणातल्या मत्यव्यवसायिकांवर अन्याय केला आहे. राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांनी देणेघेणे नसून जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने सुरु केलेला संघर्ष या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही'. 'भाजपा सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असून निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन या सरकारने पाळले नाही. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुठलाही वर्ग सरकारच्या धोरणांवर समाधानी नाही. परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे', असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

भाजपा सरकारने सर्व घटकांची फसवणूक केली असून या कोडग्या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी व लोकांचा संताप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात झाली आहे. कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्रे वाटून सरकारने शेतक-यांचा अपमान केला असून जनता सरकारला माफ करणार नाही. भाजप शिवसेना सरकारची तीन वर्ष म्हणजे घोषणांचा पाऊस आणि स्वप्नांची मालिका आहे. शिवसेनेही खोटे बोलण्याची तीन वर्ष साजरी करावीत असा टोला विखे पाटील यांनी लगावला. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस