- आविष्कार देसाईरायगड : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. आयुष्यात आज जो काही यशस्वी झालो आहे. त्यामागे परदेशी सरांचे मोलाचे योगदान आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध उद्योजक सत्यजीत दळी यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.आई हा आपला पहिला गुरू असतो. त्यानंतर, आपल्यावर संस्कार करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपले शिक्षकच पार पाडत असतात. परदेशी सरांमुळेच हे शक्य झाले आहे - सत्यजीत दळीपरदेशी सरांमुळे आयुष्यालासकारात्मक दिशा मिळालीअलिबाग शहरातील कोएसोच्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. याच शाळेमध्ये गे.ना.परदेशी सर पीटी शिकवायचे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधण्याची त्यांची नजर ते रिटायर्ड होईपर्यंत कधीच चुकली नाही. ज्यांच्यावर सरांच्या सकारात्मक विचारांचा वर्षाव झाला, त्यांच्या आयुष्याचे सोने झाले आहे....अन् जीवनाला कलाटणी मिळाली...आमच्या वर्गातील माझ्या मित्राने स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतला होता, परंतु तो सातत्याने सराव करण्यासाठी दांड्या मारत होता. सर नेहमीच विचारायचे, पण तो गैरहडजर असायचा. एकदा सरांनी त्याला त्याच्या घरी जाऊन शोधून काढले. कान धरून त्याला मैदानावर आणले. त्याला त्याच्यामध्ये असणाºया शक्तीची ओळख करून दिली. त्यांनी सरांकडे माफी मागीतली. सरांनी त्याला दिलेले लेक्चर माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरल्याने यशस्वी उद्योजक होऊ शकलो.सुदृढ शरीर आणि सकारात्मक विचारांची शिदोरीअजूनही मला आठवते, शालेय जीवनामध्ये असताना गणित, विज्ञान, इतिहास, इंग्रजी अशा विषयांचा भडिमार व्हायचा. त्यामुळे शरीर आणि मनही थकून जायचे. त्यावेळी आम्ही पीटीच्या तासाची वाट बघायचो. कारण परदेशी सरांमुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायची. पीटीचा तास म्हटले की, मैदानावर जायला मिळायचे.सर नेहमीच सांगायचे तुमचं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य उत्तम ठेवताना मानसिक संतुलनासाठी सकारात्मक विचार अत्यंत प्रेरणादायी असतात. सकारात्मक विचारच तुमचे आयुष्य बदलून टाकतील....आणि मनातील वादळ शमलेमाझ्या आॅफिसमध्ये मी बसलो असताना मनाची घालमेल सुरू होती. चित्त थाºयावर नव्हते. तितक्यात आॅफिस बॉयने सांगितले, सर आलेत. मला वाटलं कोणीतरी असेल. आत आल्यावर पाहतो तर काय, परदेशी सर आले होते. बºयाच वर्षांनी सर भेटले. त्यांनी दिलेला गुरुमंत्र आठवला आणि एका क्षणात मनातील वादळ शमले.
आयुष्यात शिक्षकांचे ऋण फेडणे कठीणच...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:44 AM