शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

बोर्लीपंचतन येथे भरपावसात पाणीटंचार्ई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:54 IST

नागरिक संतप्त : कमी दाबाने होतोय पाणीपुरवठा; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले बोर्लीपंचतन गावच्या पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने समस्या निर्माण होत आहेत. सध्या होत असलेल्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

बोर्लीपंचतन गावाला जून ते डिसेंबर या महिन्यामध्ये कोंढेपंचतन या धरणातून पाणीपुरवठा केला जातो व कार्ले येथील धरणातून जानेवारी ते मे या महिन्यात पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनबाबत अशा अघटित घटना समोर येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होत आहे. ज्या दिवशी बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला त्याच दिवशी मध्यरात्री कार्ले धरणातील पिण्याच्या पाण्याचा राखीव असणारा साठा कुणा समाजकंटकांनी नदीला सोडून दिला. कार्ले धरणातील पाणी साठ्यावर बोर्ली पंचतन, दिवेआगर, भरडखोल या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. त्यामुळे भरउन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होऊ लागला, त्याचा नाहकत्रास हा नागरिकांना सहन करावा लागला.पावसाळा सुरू झाल्यापासून कधी मुख्य पाइपलाइन फुटणे, तर कधी मुख्य वॉलमध्ये चप्पल, पत्र्याच्या टाकाऊ वस्तू सापडून पाणीपुरवठा बंद होणे असे प्रकार गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत होऊ लागले आहेत. त्यातच आता कोंढेपंचतन धरणातून बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करणाºया मुख्य पाइपमध्ये मोठा दगड आढळून आला, त्यामुळे काही दिवस पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचे घटत असणारे प्रमाण त्याचा धरणाच्या पाणीसाठ्यावर होणारा परिणाम त्यातच अशा घडणाºया घटना घडत राहिल्या तर येणाºया काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेल.कार्ले धरणातून मध्यरात्री सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. नागरिकांच्या दृष्टीने जीवनावश्यक असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा भविष्यामध्ये गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून ग्रामपंचायतीकडे के ली जात आहे.सध्या कोंढे धरणातून येणाºया पाइपलाइनला गळती लागल्याने बोर्लीकरांसाठी पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी गाव पातळीवरती ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्याकडून अथक प्रयत्नचालू आहेत. मात्र, बोर्लीपंचतन गावावरील पाणीसंकट सुटताना दिसत नाही.कोंढेपंचतन ते बोर्लीपंचतन मार्गावरील आठ इंच पाइपलाइनमध्ये सहा इंच दगड मिळाला. नंतर गणेश चौक येथील पाइपलाइनमध्ये चप्पल व टाकाऊ वस्तू मिळाल्या. अशा घटना घडत असताना ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्यांच्या सहकार्याने पुढे लवकरच मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी पाइपलाइनची दुरुस्ती सुरू आहे.- नम्रता गाणेकर,सरपंच, बोर्लीपंचतननिर्माण होणाºया प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे तरी ग्रामस्थांनीसुद्धा सहकार्य करावे, ही विनंती.- मन्सुर गिरे,उपसरपंच, बोर्लीपंचतनभरपावसात पाण्याचा एवढा अडथळा असेल तर मग एप्रिल, मे महिन्यांत काय अवस्था असेल, ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना करून मुबलक पाणीपुरवठा करावा.- अमोल चांदोरकर, ग्रामस्थ. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग