शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

इरले-घोंगडी होताहेत नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:28 IST

पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.

- विनोद भोईर पाली : पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. शेती व्यवसायातील सामानाची जुळवाजुळव करण्यात शेतकरी सध्या व्यस्त असून पेरणी, लावणीच्या कामासाठी वापरण्यात येणाºया अनेक साहित्यांपैकी इरले-घोंगडी यांनाही तितकेच महत्त्व आहे. याचा उपयोग प्रामुख्याने शेतकरी पावसात भातशेतीचे काम करत असताना भिजू नये म्हणून आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी इरले-घोंगडी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात वापरतात. याचा वापर प्रामुख्याने आदिवासी शेतकरी जास्त करीत असतात; परंतु सध्या आधुनिक युगात रेनकोटचा आणि पांघरता येणाºया प्लॅस्टिकचा वापर वाढतो आहे. मेहनत करून वस्तू तयार करण्यापेक्षा तयार वस्तू बाजारात मिळत असल्याने इरले-घोंगडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.पावसाळ्यात सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे सूत (दोरा) काढून इरले-घोंगडी बनविण्याचे काम करताना दिसतात. यातून आदिवासींना पैसेही मिळतात; परंतु जसा काळ बदलत चाललेला आहे, तशा प्रकारच्या रूढी, परंपरा व व्यवसाय, साधनेदेखील बदलत जाऊन त्याची जागा अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे. शेतीमधून बैल, नांगर हद्दपार होऊन त्याची जागा ट्रॅक्टरने व टीलरने घेतली आहे. तसेच इरले-घोंगडी बनविण्याचा व्यवसायही बदलत्या काळानुसार संपुष्टात येत आहे.पूर्वी पावसाळा सुरू झाला की, शेतकरी इरले-घोंगडी बनविणाºया व्यावसायिकांना आॅर्डर द्यायचे; पण आज या इरले-घोंंगडीचा विसर खुद्द शेतकऱ्यांनाच पडला आहे. रेनकोट, गमबूट, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांच्या खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी होऊ लागली आहे; परंतु इरले-घोंगडी बनविणाºयाकडे कुणीही फिरकलेले नाही. ५०० ते १००० रुपयांत मिळणाºया प्लॅस्टिकचा कोट पावसापासून जरी बचाव करीत असला तरी इरले-घोंगडीप्रमाणे थंडीपासून बचाव करणारा नाही, शरीराला ऊब देणारा नाही; पण हे लक्षात घेतो कोण? हेच इरले अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत तर घोंगडी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत असे. इरले-घोंगडी हे पाच ते सहा वर्षांपर्यंत वापरता येते; परंतु सध्या इरले-घोंगडीचा वापर खूप कमी झाल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.>प्लॅस्टिकने घेतली इरले-घोंगड्यांची जागाशेतीच्या कामात वापरल्या जाणाºया इरले-घोंगडीची जागा आता रेनकोट, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांनी घेतल्यामुळे इरले-घोंगडी बनविण्याच्या पारंपरिक व्यवसायावर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारात रेनकोट, मेनकापड, प्लॅस्टिक उपलब्ध होते. इरले-घोंगडी तयार करण्याचे साहित्य मिळत नसल्यामुळेही आदिवासी समाजातील कामगारांना मजुरी करून अन्य काम करून पोट भरावे लागत आहे.