शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये इंटरनेट सेवेचा बोजवारा, बीएसएनएलची सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:14 IST

महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड शहर आणि ग्रामीण भागात महामार्ग रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाल्याने सर्वच कंपन्यांच्या इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सततच्या खंडित होणाऱ्या सेवांमुळे ग्राहकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. यात सर्वाधिक फटका बीएसएनएलच्या ग्राहकांना बसत असून दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. पोस्ट आॅफिस, बँक, सरकारी कार्यालये त्याचबरोबर अन्य दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.महाड आणि परिसरात गेले वर्षभर इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडाला आहे. घराघरात मोबाइल असल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. शिवाय शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, आणि व्यावसायिक-उद्योजक इंटरनेट सुविधेचे ग्राहक आहेत. देशात सर्वच बाबतीत आॅनलाइन कामावर भर दिला जात आहे. त्यामुळे विविध प्रकल्पात खासगी आणि शासकीय कंपन्यांच्या इंटरनेटचे जाळे जोडले जात आहे.वर्षभरापासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात सातत्याने भारत संचार निगम लिमिटेडच्या केबल्स अनेकदा तोडल्या गेल्या आहेत. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या केबलचीही अवस्था थोडीफार अशीच आहे. महाड शहरात सुमारे २५० पेक्षा अधिक टेलिफोनचे कनेक्शन विविध सामाजिक संस्था, व्यापारी, बँका, एसटी महामंडळ यांना देण्यात आले.गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये टेलिफोनच्या सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लँडलाइन फोन सेवा बंद झाली आहे. असंख्य ग्राहकांनी बीएसएनएल टेलिफोन सेवा बंद करून खासगी सेवा वापरणे पसंत केले आहे. त्यातच जे बीएसएनएलचे इंटरनेट वापरत आहेत, त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. महिन्याचे बिल वेळेवर येत असले तरी सुविधांबाबत वानवाच आहे.केंद्र शासनाने सर्व व्यवहार इंटरनेटच्या मदतीने करण्याचे आवाहन करताना अनेक क्षेत्रांमध्ये सक्ती देखील केली आहे. इंटरनेट ग्राहकांवर सक्ती करताना सर्व प्रथम ही सेवा नियमित व अखंडित पुरविणे कंपनीची जबाबदारी आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून महाड शहरातील इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने बँका तसेच सरकारी कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले असून ऐनवेळी इंटरनेट सेवा बंद होत असल्याने बँॅकेतून रक्कम मिळणे देखील अशक्य झाले आहे.इंटरनेटवर चालणारी एटीएम यंत्रणा ग्रामीण भागांमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक गावांत एटीएम यंत्रणा महिन्यातून काही दिवस सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. महाड तालुक्यातील निवृत्त कर्मचाºयांची पेन्शन बँकेत जमा होत असल्याने आपल्या पेन्शनसाठी ग्रामीण भागातून येणाºया लोकांना देखील नेटअभावी वाºया कराव्या लागत आहेत. वारंवार खंडित होणाºया केबल्सप्रकरणी बीएसएनएलकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. महाड शहरासह ग्रामीण भागांमध्ये बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा वापर करणारे पाच हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. दरमहिन्याल्या बिल वेळात येते, मात्र सेवेचा बोजवाजा उडालेला आहे. याविरोधात स्थानिक ग्राहक मंचाकडे तक्र ार करण्याच्या विचारात आहेत.पोस्टामध्ये बीएसएनएलची इंटरनेट सुविधा सातत्याने खंडित होत आहे. याचा टपाल खात्याच्या विविध सेवांवर परिणाम होत आहे. पोस्टाची बँकिंग सुविधा, रेल्वे काऊंटर यामुळे बंद ठेवावे लागतात. त्यामुळे पोस्टातील ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागते.- भारती शेठ, पोस्ट मास्तर, महाडबीएसएनएलची नेट सुविधा बंद पडल्यानंतर ग्राहकांची गैरसोय होते. बँकेत व्ही. सॅट नेट सुविधा सुरू असली तरी त्याचे नेटवर्क धीम्या गतीने सुरू असते. बीएसएनएल नेटवर्क बंद पडल्यानंतर पासबुक अपडेट, डिपॉझिट रिसीट देताना अडचणी येतात. ग्राहकांना सुविधा देता येत नाही. परिणामी त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते.- प्रदीप कोटापूरम, व्यवस्थापक,आयसीआयसी बँक,महाड

टॅग्स :InternetइंटरनेटRaigadरायगड