शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day: 'योगसाधनेतून मिळते निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:57 IST

आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव मुक्ती व शरीर स्वास्थ्यासाठी योगासने ही अतिआवश्यक आहेत, असे योग प्रशिक्षक स्मिता देवळे यांनी सांगितले.

पेण : योग केल्याने आत्मविश्वास वाढतो. ताणतणाव व नैराश्यपूर्ण जीवनाचा अंत करून निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली योगसाधनेतून मिळते. निसर्गात चैतन्यशक्ती काम करते. निसर्ग सहजीवनाचा स्रोत आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम’ असे हे परस्परावलंबी जीवन आहे. मंगलमय जीवन समग्र सजीवांना जगता यावे, ही शिकवण म्हणजे योगसाधना आहे. योगामुळे वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीरयष्टी, तजेलदार त्वचा कांती, शांत आणि प्रसन्न मन, आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट हवी असते ती द्यायला योगसाधना समर्थ आहे. आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव मुक्ती व शरीर स्वास्थ्यासाठी योगासने ही अतिआवश्यक आहेत, असे योग प्रशिक्षक स्मिता देवळे यांनी सांगितले.जागतिक योगदिनानिमित्त ‘लोकमत’च्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला त्या वेळी त्या बोलत होत्या. स्मिता देवळे यांनी आर्ट आॅफ लिव्हिंग प्रीझन स्मार्ट कार्यशाळांमधून पोलीस कर्मचारी, बालसुधारगृहातील बालकांसाठी, कारागृहातील बंदिवानांसाठी, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना योगाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने धडे दिलेत. त्यांच्या या कार्याचा अनेक संस्थांनी पारितोषक देऊन गौरव केला आहे.२१ जून रोजी जागतिक योगदिनानिमित्ताने पेण पंचायत समिती मार्फत एनसीआरटी कर्मचाऱ्यांसाठी योगासने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन के ल्याचे त्यांनी सांगितले. योगसाधनेचा प्रचार करणे हेच त्यांचे ध्येय असल्याचे देवळे यांनी सांगितले. योगाबाबत उस्फुर्तपणे बोलताना स्मिता देवळे यांनी योगाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विषद केले. यामुळेच आज जगभरात योगाचे धडे दिले जात आहेत असे सांगितले.योगामुळे जीवन सुखी, समाधानी सुंदर, सुरेख कसे जगता येईल ही कला आवगत होते. योग केल्याने आत्मविश्वास वाढतो. ताणतणाव व नैराश्यपूर्ण जीवनाचा अंत करुन निरामय निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली योगसाधनेतून मिळते. योगामुळे जीवनात आनंदी राहण्यास मदत मिळते, त्यामुळे नित्य योगसाधना करावी.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन