शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक सभा, मेळाव्यांना परवानगी न देण्याच्या सूचना; जिल्हा प्रशासनाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 22:55 IST

कोरोनाच्या बचावासाठी उपाययोजना

अलिबाग : देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या सभा, मेळावे अशा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणू आजार हा मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित आहे. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्यूमोनिया, मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. कोरोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो याबाबत अजून बरीचशी संदिग्धता असली तरी हवेद्वारे, शिंकण्या-खोकल्यातून तो पसरत असल्याने जागतिक आरोग्य संस्थेने या आजाराबाबत जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळत आहेत. संशियत रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात आले आहे. राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, या विषाणूची लागण एका संक्रमित रु ग्णाकडून अन्य व्यक्तीस, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता आहे.कर्जतमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन1) सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण सापडत असूनी आरोग्य यंत्रणादेखील सज्ज झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात विषाणू संसर्ग विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून यात सहा रुग्ण ठेवण्याची व्यवस्था असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी सांगितले.2) कक्षाच्या स्थापनेप्रसंगी गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कर्जत पोलीस निरीक्षक अरुण भोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामकृष्ण पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता दळवी, औषध निर्माण अधिकारी ज्ञानेश्वर विसावे, सिस्टर इनचार्ज चेतलानी, वैशाली चासकर, रवींद्र माने आदी उपस्थित होते.