शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोर्लई गावातील ठाकरेंच्या जमिनीबाबत चौकशी करा- सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 23:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात असलेल्या जमिनीबाबत चौकशी करून कारवाई करा, या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर किरीट सोमय्या आणि कार्यकर्ते यांनी जोपर्यत चौकशी आदेश जिल्हाधिकारी देत नाही, तोपर्यंत रस्त्यावर धरणे करणार असल्याचे माजी खासदार सोमय्या यांनी म्हटले आहे.कोर्लई येथे मुख्यमंत्र्यांनी अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली ९ एकर जमीन खरेदी केली. ही जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे आहे. या जमिनीत १९ घरे आहेत. या जमिनीची रक्कम १२ कोटी असताना नाईक यांच्याकडून केवळ २ कोटी रुपयांना घेतली आहे. त्यामुळे या जमीन खरेदीत घोटाळा झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कबूल केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना घेऊन मोर्चा काढला. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न सोमैया यांनी केला. पोलिसांनी गेट बंद करून शिष्टमंडळाने आत जाण्यास पोलिसांनी विनंती केली. मात्र, सोमय्या आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी आत न सोडल्याने किरीट सोमय्या आणि कार्यकर्ते रस्त्यावरच बसून राहिले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासनाविरोधात घोषणाबाजी केली. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे