शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा तालुक्यात पीक लागवड क्षेत्रात वाढ; चाकरमान्यांचा शेतीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:56 IST

मनुष्यबळ वाढल्याने उत्पन्न वाढीवर भर

म्हसळा : तालुक्यात कोरोनाच्या कालावधीत शहरी व ग्रामीण जनजीवनात बदल झाले असतानाच, तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतींतील ८० गाव-वाड्यांतून सुमारे २० ते २१ हजार चाकरमानी दाखल झाले होते, त्यापैकी बहुतांश चाकरमान्यांनी शहरे लॉकडाऊन आसल्याने आपले लक्ष पारंपरिक शेतीकडे केंद्रित केले. त्यामुळे तालुक्यातील पीक लागवड क्षेत्र वाढले असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली.

यावेळी ७५ हेक्टर क्षेत्रांत भात, २० हेक्टर क्षेत्रांत नाचणी व सुमारे १५ हेक्टर क्षेत्रांत वरी पीक वाढले आसल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यात मागील वर्षी २,४०० हेक्टर क्षेत्रात भाताची, ४०० हेक्टर क्षेत्रात नाचणी तर सुमारे १०० हेक्टर क्षेत्रांवर वरील पिके घेतली होती. यंदा शहरातील चाकरमानी शेतात आल्याने मनुष्यबळही वाढले असल्याने, अधिक क्षेत्रात पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

तालुक्यात भातलावणी पूर्ण झाली असून, आता म्हसळा तालुक्यातील शेतकरी फळ बागायतींच्या मशागतीकडे वळला आहे. चाकरमानी आपल्या बागायतींना खते व अंतर्गत मशागतीची कामे करण्यात व्यस्त झाला आहे. काही शेतकरी रोजगार हमी योजनेंतर्गत काजू, आंबा लागवड करीत आहेत. यावेळी लावणीमध्येही तालुक्यातील चाकरमानी युवकांनी यावेळी चिखलणीसाठी यंत्राचा वापर चांगल्या पद्धतीने केला असल्याचे कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी यांनी सांगितले.

चालू हंगामात ग्रामीण भागांतून भात संकरीत व सुधारित जातीच्या बियाण्याची मागणी बºयापैकी होती. मागील वेळेपेक्षा दोन क्विंटल भाताचे बियाणे जास्त विकले गेले असल्याची माहिती खत व बियाणे विक्रेते नीलेश सायगावकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील तरुणांचा कल बºयापैकी शेतीकामाकडे झुकला आहे. खरीपात तालुक्यात भात, नागली, वरी व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी अन्य भाजीपाल्याचीही बºयापैकी लागवड केली आहे. रब्बीतील लागवडीबाबतही शेतकरी चौकशी करत आहेत.- सुजय कुसाळकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, म्हसळा

आमच्या गावात कोविड १९च्या लॉकडाऊनमध्ये आलेल्या ग्रामस्थांनी चालू खरीप हंगामात शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. खरसई, मेंदडी, बनोटी पट्ट्यांतील बहुतांश शेती व वरकस शेती लागवडीखाली आणली गेली आहे.- नीलेश मांदाडकर, सरपंच, खरसई

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड