शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानची मिनी ट्रेन अद्याप सुरू नसल्याने गैरसोय, पर्यटकांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 00:19 IST

Matheran News : काही दिवसांपूर्वी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएम (व्यवस्थापक) यांची भेट घेऊन शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, रेल्वेने याबाबत अद्यापही तत्काळ अंमलबजावणी केलेली नाही. 

माथेरान - लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरातील रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, माथेरानच्या मिनी ट्रेनची शटल सेवा अद्याप सुरू झाली नाही. सप्टेंबर महिन्यात ई-पासची अट हटविण्यात आल्यानंतर पर्यटकांचा ओघ माथेरानला हळूहळू सुरू झाला. मात्र, रेल्वेची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा अद्याप सुरू न झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना दस्तुरी नाक्यापासून गावात येण्यासाठी आपल्या सामानासह प्रवास करताना अत्यंत गैरसोयीचे होत आहे. अपेक्षेप्रमाणे पर्यटक माथेरानला येत नाहीत त्यामुळे व्यवसायाला गती प्राप्त होत नाही. यामुळे हॉटेल मालक, लॉजिंग, घोडेवाले, रिक्षावाले, दुकानदार यांच्यासह श्रमिक वर्गसुद्धा चिंतित आहे. काही दिवसांपूर्वी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएम (व्यवस्थापक) यांची भेट घेऊन शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव अभय यावळकर यांनी तत्काळ शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, रेल्वेने याबाबत अद्यापही तत्काळ अंमलबजावणी केलेली नाही. लॉकडाऊनच्या दरम्यान देशभरातील गाड्या बंद असतानादेखील संनियंत्रण समितीने आदेश देताच मालवाहतुकीची गाडी सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे मालवाहतूक गाडीची मागणी नसतानादेखील ती सुरू करण्यात आली होती. येणारे पर्यटक हे खऱ्या अर्थाने नेरळ ते माथेरान या मिनि ट्रेन प्रवासाच्या औत्सुक्याने येत असतात. हा मार्गसुद्धा उत्तम प्रकारे दुरुस्त करण्यात आलेला असताना केवळ रेल्वेच्या अधिकारी वर्गाची मानसिकता नसल्याने नेरळ-माथेरान मिनि ट्रेन सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. निदान चार फेऱ्या नेरळ- माथेरानदरम्यान असाव्यात जेणेकरून इथे पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येईल. याच माध्यमातून रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नातसुद्धा निश्चित वाढ होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मिनि ट्रेन सेवा लवकरच सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला देण्याची मागणी व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष दीपक शाह यांनी केली आहे.

   

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड