शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या शाळांच्या यादीत उरणच्या भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:01 IST

प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता. 

मधुकर ठाकूर 

उरण : पीएलसीच्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वोत्तम १०० शाळांच्या  यादीत उरण येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती. भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाचा समावेश आहे.या प्रकल्पात राज्यातील ६४,१९८ शाळा सहभागी झालेल्या होत्या.या शाळांमध्ये प्रभावी कामगिरी नोंदवणाऱ्या उरण येथील विद्यालयाचे कौतुक केले जात आहे.

प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता. प्रकल्पात सहभागी होणारे विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश देणारे दूत नसून कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्य मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांने केला होता. ६४ हजारांहून अधिक शाळांची सहभागाची नोंदणी झाली होती. विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. विद्यार्थ्यांने "गांधीगिरी" करत इतरांने केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून घाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित होते. घटनेचे विवरण सांगताना व्हिडिओ करून सोशल मीडियाला शेअर केले जातात.

पहिल्या टप्प्यात असे १५ लाखाहुन अधिक विडिओ शेअर झाले आहेत. या संकल्पनेला गती मिळाल्याने  “दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. ठिकठिकाणी  प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी चुक दाखवून दिली तरच जास्तीत जास्त नागरिक जागरूक होतील आणि महाराष्ट्र निष्काळजी मुक्त बनेल” अशी माहिती प्रकल्प संचालक रोहित आर्या ने दिली. पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कारही मुंबई येथे एका कार्यक्रमात केला जाणार आहे. श्रीमती. भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  अनुराधा काठे यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागो जागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. तर शाळा समन्वयक  अंकिता पाटील, कु. सोफिया शेख, आणि सर्व वर्ग शिक्षिका नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शनही केले. विद्यालयाच्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर ,व्हॉईस चेअरमन . वाय. टी.देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :uran-acउरणSchoolशाळा