शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

भाजप बैठकीत तालुका अध्यक्षाची वरिष्ठांच्या धोरणावर नाराजी, पण तटकरे यांना निवडून आणणार

By राजेश भोस्तेकर | Updated: April 3, 2024 17:21 IST

अशीही खंत व्यक्त करीत उदय काठे यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार अशी ग्वाही ही दिली आहे. 

अलिबाग : जिल्ह्यात पक्ष बांधणी करून पक्षाची ताकद वाढवली. २०२४ लोकसभेला भाजपचाच उमेदवार असणार असे प्रत्येक मेळाव्यात नेत्यांनी कार्यकर्त्याच्या मनात बिंबवले आणि शेवटी वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करायचे अशी खंत भाजपचे तालुका अध्यक्ष उदय काठे यांनी भाजप बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स समलेन आणि नियोजन निवडणूक बैठकित बोलून दाखवली आहे. प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला झुकते माप मिळाले आहे. मात्र निवडून आल्यानंतर पक्षालाच नावे ठेवतात. अशीही खंत व्यक्त करीत उदय काठे यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना निवडून आणणार अशी ग्वाही ही दिली आहे. 

रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका स्तरावर भाजपची बैठक घेण्याबाबत वरिष्ठांनी सूचना केली आहे. त्यानुसार अलिबाग येथे मंगळवारी भाग्यलक्ष्मी सभागृहात भाजप बूथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स समलेन आणि नियोजन निवडणूक बैठीकचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, आमदार रवींद्र चव्हाण, लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, गिरीश तुळपुळे, भाजप नेते हेमंत दांडेकर, अलिबाग विधानसभा निवडणूक प्रमुख दिलीप भोईर, सरचिटणीस ऍड महेश मोहिते, राज्य प्रतिनिधी राजेश मापरा, सरचिटणीस गीता पालेरेचा, उपध्याख वैकुंठ पाटील, सोपान जांभेकर, यासह मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजप बैठकीत तालुकाध्यक्ष उदय काठे यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांची खंत पदाधिकारी यांच्यासमोर व्यक्त केली आहे. धैर्यशील पाटील हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असणार अशीच धारणा कार्यकर्त्यांची झाली होती. त्यामुळे यंदा कमळ चिन्हावर निवडणूक होईल अशी आशा प्रत्येक कार्यकर्त्याची होती. मात्र नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे यासाठी रायगडाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपवर आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पाळणार असून शिवसेना, राष्ट्रवादी पेक्षा भाजप हा तटकरे याना निवडून आणण्यात आघाडीवर असेल असा विश्वास उदय काठे यांनी बोलून दाखवला आहे. मात्र पक्षाच्या धोरणावर स्पष्ट नाराजीही काठे यांनी भर सभेत बोलून दाखवली आहे. त्यामुळे काहीशी पंचायत पदाधिकारी यांची झाली. 

उदय काठे यांनी उपस्थित केलेल्या खंत बाबत सर्वच पदाधिकारी यांनी दुजोरा दिला असला तरी मोदी ना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येकाने एक दिलाने काम करा असे आवाहन हेमंत दांडेकर, सतीश धारप, आमदार रवींद्र चव्हाण, गिरीश तुळपुळे, परशुराम म्हात्रे आणि इतर मान्यवरांनी केले आहे. 

आमचं दुकान बंद करण्याची हिम्मत नाही, आमच्या मुळे तुमची दुकाने सुरू -२०१९ ला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे काम केले. अलिबाग विधानसभा शिवसेनेकडे होती. त्याचे काम करून महेंद्र दळवी याना निवडून आणले. भाजपच्या मतावर आमदार निवडून आले. मात्र निवडून आणल्यानंतर हेच आमदार विचारतात तुमची भाजप कुठे आहे. अनेकांना आमदार सांगतात भाजप वाढणार नाही तुमचे दुकान बंद करा असे म्हणत आहेत. पण मी जाहीर सांगतो आमचे दुकान बंद करण्याची कोणाची हिम्मत नाही आहे. त्याची दुकाने आमच्या मुळे चालू आहेत असा टोला महायुतीचे आमदार महेंद्र दळवी याना काठे यांनी मारला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस