शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू बाबांचा सुळसुळाट, घरातील महिलांना बनवतात सावज; परळीत सुज्ञ नागरिकांनी केला पर्दाफाश

By निखिल म्हात्रे | Updated: December 11, 2023 15:56 IST

गावात फिरत असलेले भोंदू बुवा एकटी महिला पाहून घरात घुसत होते.

अलिबाग - पाली येथील काही भागात भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला आहे. भगवी वस्त्रे परिधान केलेले हे बाबा खोटे चमत्कार दाखवून घरातील महिलांना सावज बनवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. परळी व जांभूळपाडा परिसरात अनेक घरात शिरून या बाबांनी पैसे लाटले आहेत. येथील सुज्ञ नागरिकांनी रविवारी या तीन बाबांना पकडून समज दिली. सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सोमवारी पाली पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली. 

गावात फिरत असलेले भोंदू बुवा एकटी महिला पाहून घरात घुसत होते. आणि रिकाम्या हातातून रुद्राक्ष काढणे, छोट्या भस्मचे मोठी भस्माची पुडी बनविणे, कमंडलुतून शंकराची पिंड काढणे असे चमत्कार करून दाखवत होते. गोड बोलून खोटे दावे करत होते. त्यानंतर या महिलांना घरातून पैसे दान करा असे सांगून बोलण्यात गुंगवून अधिकची रक्कम आणायला सांगून तिथून पोबारा करत होते. अशा प्रकारे परळी जांभूळपाडा परिसरातील अनेक जणांची फसवणूक या भोंदू बाबांनी केली आहे. असे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सांगितले. हे भोंदू बाबा एका घरात शिरले असतांना राहुल गायकवाड व ग्रामस्थांनी त्यांना पकडले व जांभुळपाडा दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात नेले व या भोंदू बाबांना चांगली समज दिली. त्यांचे आधार कार्ड तपासले असता ते खोटे होते. हे भोंदू बाबा जालना येथील असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत मी अधिक माहिती घेत आहे. लोकांनी कोणीही अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला घरामध्ये घेऊ नये. त्याच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करू नये. यावेळी लागलीच आजूबाजूच्या लोकांना बोलवावे. या व्यक्तीचा संशय आल्यास ताबडतोब 112 नंबरवर कॉल करावा. पोलीस त्या ठिकाणी पोहचून पुढील कार्यवाही करतील.- सरिता चव्हाण, पोलीस निरीक्षक, पालीचमत्काराचा दावा करणारे हे बाबा भोंदू असतात. यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अशा भोंदू बाबांवर कारवाई होऊ शकते. कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा असू शकते. ज्यात दंड 5000 ते 50000 रुपये पर्यंत आहे. हे गुन्हे अजामीनपात्र आणि दखलपात्र आहेत.- मोहन भोईर, कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगडहे साधू घरामध्ये शिरले. परमार्थ करत असल्याने मी त्यांना 20 रुपये दिले. मात्र त्यांनी खोटे चमत्कार दाखविण्यास व खोटे दावे सांगण्यास सुरुवात केली. ही लबाडी कळल्यावर लागलीच मी त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. व शेजारील महिलेला बोलावले लागलीच या बाबांनी तेथून पळ काढला.रिया राहूल गायकवाड, गृहिणी, परळी

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस