शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना ठरतेय सकारात्मक; हेल्पलाइनद्वारे जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 05:18 IST

जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनद्वारे रायगड जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात वन विभागाला यश आले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : जंगलांना लागणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाइनद्वारे रायगड जिल्ह्यातील ३६ वणवे विझवण्यात वन विभागाला यश आले आहे. वणवे लागलेल्या ठिकाणी तेथील वणवे अधिक उग्ररुप धारण करण्याआधीच वन विभागाची मदत पोचल्याने वन्य जीवांच्या रक्षणासाठी ‘हॅलो फॉरेस्ट’ही संकल्पना सकारात्मक ठरत आहे. वन विभागाचा हेल्पलाइन नंबर सातत्याने खणखणत असल्याने नागरिकांमध्ये ‘हॅलो फॉरेस्ट’बाबत जागृती होत असल्याचे दिसून येते.रायगड जिल्हा हा निसर्ग संपन्नतेने नटलेला जिल्हा आहे. समुद्राबरोबरच येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने त्याच्या सौंदर्यात भरच पडते. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे उन्हाळ््याच्या मोसमामध्ये शेतीची मशागत सुरु असते. त्यावेळी शेतात लावलेल्या आगीमुळे एखादी ठिणगी वनसंपदा नष्ट करण्यास कारणीभूत ठरते. जळती सिगारेट गवतामध्ये फेकल्यानेही आग लागण्याचे कारण ठरत आहे. त्याचप्रमाणे वातावरणातील अतिउष्णतेमुळे दगडाच्या घर्षणामुळे ठिणगी उडूनही गवत पेटल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्व प्रकारांमुळे वनांना वणवे लागण्याच्या घटना घडत असतात. रात्री अपरात्री वणवे लागल्यास त्याबाबत काहीच माहिती मिळत नसायची. त्यामुळे मोठ्या संख्येने वनसंपदा जळून खाक होत होती. तसेच काही वेळेला वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसणे, जंगलाची अनधिकृत तोड करणे, वन जमिनीतून बेकायदा उत्खनन करणे अशा घटनाही सातत्याने घडत होत्या.वन विभागाचे क्षेत्र मोठे असल्याने सर्वच ठिकाणी लक्ष देणे कठीण होते. यासाठी ६ जानेवारी २०१७ साली सरकारने ‘हॅलो फॉरेस्ट’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. यासाठी १९२६ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी खुला करण्यात आला. अलिबाग, उरण, कर्जत, पनवेल तालुक्यातील नागरिकांनी या हेल्पलाइनचा आतापर्यंत सर्वाधिक वापर केला आहे. २०१७ या कालावधीत १० आणि २०१८मध्ये २६ वणवे लागण्याच्या घटना घडल्याबाबत त्यांनी माहिती वन विभागाला दिली आहे. त्यामुळे वन विभागाला वेळीच उपाययोजना करणे शक्य झाले आहे. तातडीने त्या ठिकाणी मदत पोचवून आग विझवण्यात वन विभागाला यश आले आहे. वेळीच माहिती उपलब्ध झाल्याने लागलेल्या वणव्याचे रूपांतर फार मोठ्या आगीत झालेले नाही. त्यामुळे वन संपदेचे होणारे नुकसान टाळता आले आहे.‘हॅलो फॉरेस्ट’ हेल्पलाइनवर कोणीही सर्वसामान्य नागरिक वनविभागाशी संबंधित तक्र ार करु शकतो. तक्र ार केल्यानंतर मुंबई येथील केंद्रीय नियंत्रण कक्षातून संबंधित वन अधिकाऱ्यांना एसएमएस येतो. त्यानंतर वन अधिकारी संबंधित अधिकाºयाकडे माहिती देतो. त्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाते. त्यानंतरही नियंत्रण कक्षातून त्या तक्रारीचा पाठपुरावा केला जात असल्याने तक्रारी सुटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.तत्काळ मदत पोचवणे सहज शक्यरायगड जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या बेकायदेशीर शिकारी केल्या जातात. जैवविविधता धोक्यात आणणारी ही बेकायदेशीर शिकार रोखण्यासाठीही या हेल्पलाइनचा वापर आता रायगड जिल्ह्यात होत आहे. २४ तास कार्यरत असणाºया या हेल्पलाइनमुळे वनविभाग कर्मचारी, वनसमितीचे सदस्य, सर्पमित्र, निसर्ग मित्र यांच्या मदतीने तत्काळ मदत पोचवणे सहज शक्य झाले आहे.त्याचप्रमाणे मालकी क्षेत्रात शिरणाºया वन्य प्राण्यांमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होते. हे वाचविण्यासाठीही ही हेल्पलाइन उपयुक्त ठरत आहे. काही लोकांच्या घरामध्ये साप शिरल्याच्या तक्रारी हे हेल्पलाइनवर आल्या आहेत. त्यानुसार संबंधित सर्प मित्रांना तेथे पाठवणे सोपे झाले आहे. नागरिकांच्या तक्र ारीचे तत्काळ निरसन केले जात असल्याने या हेल्पलाइनची चांगली मदत होत आहे.वणवे लागल्याने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. कारण वणवे लागल्याची माहिती खूपच उशिरा मिळत होती. हेल्पलाइनवर मोठ्या संख्येने फोन, एसएमएस येत असल्याने लागलेले वणवे तातडीने आटोक्यात आणण्यात यश येत आहे. नागरिकांमध्ये चांगलीच जागरुकता आली आहे. त्यामुळे वनांसह वन्य प्राण्यांचे रक्षण करता येत आहे.- मनीष कुमार, जिल्हा वन अधिकारी, रायगड

टॅग्स :fireआग