शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मच्छीमारांच्या जाळ्यात अडकले भलेमोठे दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 16:30 IST

मच्छीमारांनी या कासवाला समुद्रात सोडले.

मधुकर ठाकूर,उरण :  मासळी पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या एका दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीच्या कासवाला करंजा-कोंढरीपाडा येथील मच्छीमारांनी समुद्रात सोडून दिले. 

करंजा गावातील कोंढरीपाडा येथील भारत हिराजी पाटील व त्यांचे सहकारी नेहमी प्रमाणे मंगळवारी (२६) समुद्रात आपली बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी गेले होते.त्यांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी टाकले होते .थोड्या अवधीनंतर टाकलेले जाळे बोटीत खेचले . मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात मासळी ऐवजी भलेमोठे दुर्मिळ ओलिव्ह रिडले जातीचे एक समुद्री कासव अडकून पडल्याचे आढळून आले. भारत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास कासव जाळ्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होते. मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या कासवाची अलगदपणे सुटका केली. जाळ्यातुन बाहेर काढलेल्या दुर्मिळ समुद्री कासवाला लागलीच समुद्रात सोडून दिले.

 हे दुर्मिळ कासव ग्रीनसी टरटल (Green sea turtle किंवा Olive redley  या नावाने ओळखले जाते.या जातीची मादी वर्षांकाठी एका सिजनमध्ये दोन ते तीन वेळा घरटी बांधते आणि  एकाच वेळी १०० अंडी देते असे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राणीमित्र विवेक केणी यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण