शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनला हॉटेल, बीच सुरू, पण व्यावसायिकांना पर्यटकांची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 00:35 IST

Shrivardhan : १ नोव्हेंबरपासून दिवेआगारमधील पर्यटन सुरू झाले आहे. येत्या काळात किती पर्यटक येतील आणि विस्कळीत झालेली आर्थिक घडी बनवण्याचे आव्हान हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे.

- गणेश प्रभाळे 

दिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हॉटेल्स खुली झाली, पण पर्यटक अद्याप न फिरकल्याने हॉटेल व्यावसायिकांचा थोडा अपेक्षाभंगच झालेला आहे. सरकार पर्यटन सुरू करू पाहत असले, तरी जोपर्यंत पर्यटक येणार नाहीत, तोपर्यंत हॉटेल्स खुली करूनही अर्थ नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.१ नोव्हेंबरपासून दिवेआगारमधील पर्यटन सुरू झाले आहे. येत्या काळात किती पर्यटक येतील आणि विस्कळीत झालेली आर्थिक घडी बनवण्याचे आव्हान हॉटेल व्यावसायिकांसमोर आहे. सध्या दिवेआगरमध्येच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ परवाना अंतर्गत निवास आणि न्याहारीचे १५० हून अधिक हॉटेल व घरगुती साधारण १५० व या व्यतिरिक्त २५ प्रमुख खानावळी आहेत. कोरोनात पर्यटकांची हॉटेल रूम्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जाते. सर्वासाठी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर नित्यानेच केला जातो. अनेक कामगार आपल्या मूळगावी गेलेले आहेत, ते परतण्यासही थोडा वेळ लागेल. दिवाळीमध्ये जर पर्यटक आले, तर हॉटेलमधील रेस्टॉरंट्सही सुरू करता येतील. कोरोनातून सावरणाऱ्या कोकणासाठी नव्याने पर्यटन धोरण ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. या काळात मार्केटिंग, कौशल्य व्यवस्थापन, व्यावसायिक प्रशिक्षण यांवर भर द्यावा लागणार आहे. 

पर्यटकांची दिवेआगर येथे भेट देण्यास सुरुवात होत आहे. आता झालेल्या वीकेंडला तेवढी गर्दी झाली नाही.- स्वप्निल पाते, हॉटेल व्यावसायिक, दिवेआगर

आठ महिन्यांनंतर आम्ही व्यवसाय सुरू केला आहे. संकट दूर करण्यासाठी येथे शासन सुविधा मिळाव्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.- रामदास वाघे, व्यावसायिक, दिवेआगर

दिवेआगर येथे सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्टीत सहकुटुंब येथे येण्याचा बेत आखला आहे.- मुकुंद म्हसवडे, पर्यटक, पुणे

पर्यटन सुरू होऊन चार - पाच दिवस झाले आहेत. गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळी हाऊसफुल्ल होईल. अशी आशा आहे.- देवेंद्र नार्वेकर, हॉटेल व्यवसायिक

सध्या येथे ५० ते ६० टक्क्यांनी पर्यटकांची संख्या दिसते आहे. पुढे ही संख्या वाढण्याची खात्री आहे.- प्रीतम भुसाणे, व्यवसायिक, दिवेआगर.

टॅग्स :Raigadरायगड