शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घोडे मालकांच्या चुका जीवावर; पर्यटकांची बेफिकिरीही घातक, माथेरानमधील ६४ वर्षे जुने नियम बदलण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:12 IST

याबाबत अधिक माहिती घेतली असता घोडेमालकांच्या चुका आहेतच, शिवाय पर्यटकांची बेफिकिरीही तेवढीच आहे, तसेच माथेरानमध्ये असलेल्या जुन्या कायद्यात बदल होणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.

बापू बैलकर -

माथेरान : माथेरानमध्ये एका पर्यटकाचा नुकताच घाेड्यावरून पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना काही पहिलीच नाही. यापूर्वीही वारंवार असे अपघात झाले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता घोडेमालकांच्या चुका आहेतच, शिवाय पर्यटकांची बेफिकिरीही तेवढीच आहे, तसेच माथेरानमध्ये असलेल्या जुन्या कायद्यात बदल होणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.

अपघाताची कारणे काय?  अश्वचालक नवखे व अप्रशिक्षित    घोडेस्वारी करताना हेल्मेटघातले जात नाही    पर्यटकांच्या मागणीनुसार घोडा पळविला जातो घोडेस्वारी सुरू असताना अश्व चालकाला छायाचित्रे किंवा व्हिडीओ काढण्याचा आग्रह

पोलिस सुरक्षा हवीमाथेरानमध्ये दिवस-रात्र पर्यटक फिरत असतात. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. मात्र, त्या तुलनेत सुरक्षा अपुरी असते. अनेकदा पोलिस महत्त्वाच्या ठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळे पोलिस सुरक्षा असल्याने घोडेमालकांसह पर्यटकही बेफिकिरीने वागणार नाहीत, अशी मागणी माथेरानकरांनी केली आहे.

जुनी नियमावली बदलणे गरजेचेमाथेरानमध्ये सध्या ‘माथेरान होस्ट १९५९’ नुसार नियमावली लागू आहे. मात्र, काळानुसार ही नियमावली अपुरी पडत आहे. यासाठी आम्ही जिल्हा पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून यात बदल करणे गरजेचे असल्याचे कळविणार आहोत, असे माथेरानचे सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

कडक नियमावलींची गरज आहे. आता आमच्या हातात फक्त सूचना करणे एवढेच असून ते आम्ही करीत आहोत.

अपघातांची मालिका -१९९७ - घोडा उधळल्यामुळे लुईझा पॉइंटवरून पडून घोड्यासह परदेशी महिलेचा मृत्यू २००० - सिनेनिर्माते आचार्यांचा  घोड्यावरून पडून मृत्यू२०१५ - इंडिया मेह्यू या परदेशी महिलेचा घोडेस्वारी करताना घोड्याच्या पायाखाली येऊन मृत्यू २०१६ - नीलमसिंग या पर्यटक महिलेचा घोड्यावरून पडून मृत्यू२०१८ - ग्रँट रोड येथील रशीदा रेडिओवाला या महिलेस गंभीर दुखापत२०२३ - घोडा उधळल्यामुळे मोहम्मद शेख यांचा मृत्यू

नगरपालिकेने पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवल्याने घोड्यांचे पाय घसरून अपघात वाढले आहेत. पर्यायी रस्ते देण्याची मागणी केली आहे. आमचे घोडे चालक हे प्रशिक्षित आहेत.    -आशा कदम, अध्यक्ष, अश्व पालक संघटना  

टॅग्स :MatheranमाथेरानAccidentअपघातtourismपर्यटन