शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

शाळांना सुट्टी मात्र खासगी क्लासेस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:32 IST

मुलांच्या सुरक्षेचे काय?; संबंधितांवर कारवाईची मागणी

- सिकंदर अनवारेदासगाव : गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पुराचे पाणी शिरल्याने मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र, खासगी क्लासेसकडून क्लासेस सुरूच ठेवले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. क्लासेस सुरू ठेवल्याने अनेक मुलांना ग्रामीण भागातून पुराच्या पाण्यातून वाट काढत यावे लागले आहे. शासकीय आदेश न पाळणाऱ्या या खासगी क्लासेसवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.मुसळधार पावसाने दाणादाण उडाली असून, महाड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील एस.टी. सेवा आणि खासगी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. महाड आणि परिसरात सातत्याने पाणी रस्त्यांवर येत आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या इशाºयामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. तालुक्यातील बहुतांश शाळा या ग्रामीण भागात आणि नदी, नाले आणि ओठ्याकाठी आहेत. तर शहरातही पूरस्थिती असल्याने शाळा, महाविद्यालये, बंद ठेवण्यात आल्या. शहरात पुराचे पाणी असल्याने कोणताच धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असला तरी खासगी क्लासेसने मात्र याकडे दुर्लक्ष करून क्लासेस सुरूच ठेवले आहेत.महाड शहरात अनेक खासगी क्लासेस आहेत. यामध्ये शेकडो मुले शिक्षण घेत आहेत. क्लास असल्याने विद्यार्थीही क्लासला येण्यासाठी कोसळणाºया पावसाचा विचार न करता क्लासमध्ये दाखल होत आहेत. महाडमध्ये आजूबाजूच्या गावातूनही खासगी क्लासमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दादली पूल, गांधारी पूल, महाड दस्तुरी नाका, बिरवाडी आदी भागात गेले पाच दिवस पुराचे पाणी कायम आहे. क्लासमध्ये विद्यार्थी दाखल झाल्यानंतर पाणी पातळीत वाढ झाल्यास घरी सुरक्षितपणे जाणे कठीण होणार आहे. याचा विचार मात्र खासगी क्लासेस चालकांनी न करता क्लासेस सुरूच ठेवले. यामुळे पालकांनी आश्चर्य व्यक्त के लेआहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी क्लासचालकांची उठाठेव सुरू आहे.याबाबत माहिती प्राप्त झाल्यास चौकशी करून तत्काळ करवाई केली जाईल.- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अलिबाग