शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिडे होमचे झाले ‘निवांत वृद्धाश्रम’ डॉक्टर दाम्पत्यांचा आगळा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 02:31 IST

अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणापोटी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायात हॉलिडे होमचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो, अशा पार्श्वभूमीवर चांगली अर्थप्राप्ती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते.

- जयंत धुळपअलिबाग - अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणापोटी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायात हॉलिडे होमचा व्यवसाय नेहमीच तेजीत असतो, अशा पार्श्वभूमीवर चांगली अर्थप्राप्ती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र, नागावमधील आपले हॉलिडे होम पुढील दोन वर्षांसाठी वृद्धाश्रमास आणि तेही मोफत देण्याची येथील नाबर दाम्पत्याची सामाजिक बांधीलकी एक आगळा आदर्श ठरली आहे.त्वचारोग तज्ज्ञ डॉ. किरण नाबर हे शिवशांती स्नेहालय सेवेभावी न्यासाच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरे आयोजित करून मोफत रुग्णसेवा करतात. नाबर या न्यासाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री नाबर या नागाव गावात निवांत हॉलिडे होम चालवतात. शिवशांती स्नेहालय सेवेभावी न्यासाचा मुख्य हेतू वृद्धाश्रम बांधण्याचा आहे. त्यांच्या हेतूला सामाजिक बांधीलकीतून डॉ. सुभाष म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा म्हात्रे यांनी अर्धा एकर जमीन वृद्धाश्रमाकरिता न्यासाला मोफत देऊन आगळा आदर्श निर्माण केला आहे.नवीन इमारत उभारणीकरिता सुमारे ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या जागेवर वृद्धाश्रमाची इमारत बांधण्याकरिता सरकारी परवानग्या मिळवून प्रत्यक्ष इमारत उभी राहाण्याकरिता किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.नव्या इमारतीकरिता दोन वर्षे थांबण्यापेक्षा वृद्धाश्रम सुरू करून दोन वर्षांसाठी न्यासाला ते विनाशुल्क दिले आहे. महाराष्ट्र दिनी ‘निवांत हॉलिडे होम’चे रूपांतर ‘निवांत वृद्धाश्रमात’ होऊन प्रत्यक्षात ते कार्यान्वित झाले आहे.

टॅग्स :docterडॉक्टरSocialसामाजिक