शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

होळीसाठी कोळी बांधवांची लगबग

By admin | Updated: March 9, 2017 02:30 IST

होळी सण हा कोळी समाजाचा आवडता सण असून, या सणाची कोकणातील सर्व कोळी समाज फार आतुरतेने वाट बघत असतो. वर्षभरातून जी मासेमारी होते त्यातील उत्पन्नातून

- संजय करडे,  नांदगाव/मुरूडहोळी सण हा कोळी समाजाचा आवडता सण असून, या सणाची कोकणातील सर्व कोळी समाज फार आतुरतेने वाट बघत असतो. वर्षभरातून जी मासेमारी होते त्यातील उत्पन्नातून ही मंडळी हा सण मोठ्या उत्सहात साजरा करतात. होळी सण जवळ आला की, सर्वात प्रथम होड्यांना रंगीबेरंगी पट्ट्यांनी सजवून, त्याला झालर, वेगवेगळ्या रंगांचे झेंडे मोठ्या डौलाने सजवतात. तसेच होडीच्या किनाऱ्यास आकर्षक फुलांची माळ सजवल्याने होड्यांच्या सांैदर्यात अधिक भर पडते. रायगड जिल्ह्यातील असंख्य कोळी बांधव हा सण मोठ्या उत्सहात साजरा करत असतात. खोल समुद्रातून मासेमारी झाल्यावर ही मंडळी मुंबई येथील ससून डॉक (कुलाबा मार्केट) येथे मिळालेली सर्व मासळी विकून खंदेरीच्या वेताळ देवाचे दर्शन घेऊनच घरी परतात. तर यातील काही जण गावाकडून स्वत:च्या बोटीनेसुद्धा वेताळ देवाच्या दर्शनाला येत असतात.खंदेरीचा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असून राजे शिव छत्रपती यांनी १६७९ रोजी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाल्याची नोंद पुरातन दस्तवेजातून मिळत आहे. या किल्ल्यावर दीपगृह, महादेव मंदिर, पाण्याची टाकी, हौद, गणेश व मारु ती मंदिर, पीर, चौथरे आहेत. या किल्ल्यात कोळी समाजाचे श्रद्धास्थान वेताळ देवाचे मंदिरसुद्धा आहे. होळीसाठी काही दिवस घरी परतणाऱ्या मच्छीमारांच्या होड्या श्रद्धेने खंदेरीच्या किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात. या देवाला मानाचा नारळ, पुष्पहार, श्रीफळ, पेढे तसेच मानपानाचा कोंबडा येथे मोठ्या श्रद्धेने अर्पण केला जातो. या वेळी समस्त कोळी बांधव मंदिरामध्ये एकत्र हात जोडून त्यांच्या नौकेचे, जाळीचे, त्यांच्या जीविताचे रक्षण कर. तसेच पुरेसे नौकेला मासे मिळून दे, अशी प्रर्थना वेताळ देवाकडे केली जाते.याबाबत अधिक माहिती देताना मुरूड कोळीवाड्यातील एकवीरा व कमलावती या होड्यांचे मालक चंद्रकांत बाबू सरपाटील म्हणाले की, ‘होळी हा कोळी समाजाचा आवडता सण असून, दरवर्षी प्रथेप्रमाणे खंदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाचे दर्शन घेण्याची आमची परंपरा आहे.’