शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

थंड हवेच्या माथेरानला आता धोक्याची घंटा; तापमानवाढ कायम, बाजारपेठेत शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 12:41 IST

थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान गेल्या काही दिवसांपासून अधिक तापू लागले आहे.

माथेरान : थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान गेल्या काही दिवसांपासून अधिक तापू लागले आहे. मंगळवारी पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे चिंता व्यक्त हाेत आहे. 

एप्रिल, मे महिन्यात राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढत असला तरी माथेरान थंड राहते, अशी ख्याती होती. परंतु आता त्यामध्ये बदल होऊ लागला आहे. मंगळवारी  उच्चांकी तापमानाची नोंद केली असून अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत  गेल्याने येथील पर्यटनाबाबतच चिंता निर्माण झाली आहे. थंड हवेच्या ठिकाणी  तापमान वाढ होत असेल तर येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओढा आपसूकच कमी होणार आहे. 

त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा आहे, असे समजण्यात येते.  वातावरणातील बदलाचा फटका माथेरानच्या पर्यटनाला बसत आहे. येथे थंड हवेसाठी येणाऱ्या पर्यटकांना या बदलाला सामोरे जावे लागत असून त्याचा निश्चितच विपरीत परिणाम येथील व्यवसायावर होणार आहे. दुपारनंतर येथील वातावरणामध्ये कमालीचा बदल घडत असून ढगाळ वातावरणामुळे येथे गर्मी वाढताना दिसते.  सायंकाळी मात्र थंड हवा सुटल्याने नागरिकांना  दिलासा मिळतो, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.   

दरम्यान, गुरुवारी तापमानाचा पारा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट होता.

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड