शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 21:59 IST

रायगड- जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाऱ्यावरील गावांना "ओखी" चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे.

- जयंत धुळपरायगड- जिल्ह्यातील समुद्र, खाडी किनाऱ्यावरील गावांना "ओखी" चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सावधानतेचा इशारा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.पुढील 48 तासात वादळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रतितास राहणार असून, समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करू नये. तसेच जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तात्काळ सुरक्षित बंदरावर आसरा घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.मंगळवार 5 डिसेंबर रोजी रात्री 00.50 मिनिटांनी (आज रात्री 1 वा.) 5.01 मीटर उंचीची समुद्रास भरती असणार आहे. त्यामुळे सखल व किनाऱ्यालगतच्या भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141 222118 / 222097 / 227452 तसेच  टोल फ्री नंबर 1077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी केले आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ