शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 12:26 IST

सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवेने गडावरून खाली नेण्यात येत आहे.

Raigad Fort ( Marathi News ) : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. राजधानी मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाने झोडपून काढलं आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवीर आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद  करण्यात आला आहे.

रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून  बंद करण्यात  आला आहे. पोलीस  बंदोबस्त नेमण्यात  आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवेने गडावरून खाली नेण्यात येत आहे. प्रशासनाकडून किल्ल्यावर  जाण्यासाठी रोपवे बंद करण्यात  आला आहे.

हवामान खात्याचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

कोकणात पावसाचं थैमान

रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसाचा अलिबाग तालुक्यालाही मोठा फटका बसला असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसून नागरिकांच्या सामानाचे नुकसान झाले आहे. अलिबाग रोहा रस्ता रस्त्यावर पाणी साचल्याने पावसामुळे वाहतुकीस बंद झाला आहे. तालुक्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दिवसभर कोसळलेला पाऊस रात्रीही मुसळधार सुरू होता. सोमवारची सकाळ ही मुसळधार पावसानेच झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. पावसात सातत्य राहिले तर नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि पूर येईल असे चित्र दिसत आहे.

टॅग्स :RaigadरायगडFortगडRainपाऊसweatherहवामान