शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; राब करपण्याची भीती झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 01:10 IST

शेतीच्या कामांना वेग : २४ तासांत ३३६ मिमी पाऊस,

रायगड : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ३३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ५, ६ आणि ७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. पावसाची अनिश्चितता असल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. अख्खा जून महिना कोरडा गेला होता. कमी-अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात राब टाकले होते, परंतु पाऊस गायब झाल्याने राब करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. राब करपले असते, तर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले असते, परंतु जुलै महिना लागताच पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकºयांची चिंता दूर झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामेही सुरू आहेत.

अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव, म्हसळा, खालापूर, पाली, पनवेल यासह अन्य तालुक्यांमध्ये भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे या ठिकाणी शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतीची कामे रखडली होती. शेतात टाकलेला राबही करपण्याची भीती निर्माण झाली होती. आता पावसाने सुरुवात केल्याने मनातील भीती दूर झाली आहे. पावसामुळे आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे, असे अलिबाग तालुक्यातील आत्माराम पाटील यांनी स्पष्ट केले.

समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळणारनिसर्ग चक्रीवादळाने ३ जून रोजी जोरदार तडाखा दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून जिल्हा सावरत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३ जुलै ते ८ जुलै रोजी समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत समुद्रामध्ये सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रात कोणीच जाऊन नये, असा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाºयानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती