शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

मुरुड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

By admin | Updated: June 21, 2016 01:33 IST

मुरुड तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावत सहा तासांत १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे

नांदगाव /मुरु ड : मुरुड तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावत सहा तासांत १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असून समुद्र खवळलेला आहे. जंजिरा किल्ला बोट वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. पर्यटकांचे लोंढे कमी झाले असून समुद्रकिनारा ओस पडला आहे. सोमवारी सुध्दा मुरु ड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस असून भात शेतीची लगबग पहावयास मिळत आहे. वीज सातत्याने गायब झाल्याने समस्त नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ९ ते १० तास वीज गायब होत आहे. समुद्रात बोटी नेण्यासाठी १ जूनपासून बंदी घालण्यात आल्याने मासळी बाजारात मासळीचा तुटवडा जाणवत आहे, तर मासेमारी पूर्णत: बंद झाल्याने कोळी बांधवांवर आर्थिक संकट आले आहे. सध्या पेराद्वारे मासळी पकडली जात आहे. खोल समुद्रात बोटी जाऊ नये व कोळी बांधवांच्या जीवाचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मोठ्या बोटी तसेच मध्यम बोटी समुद्रात जाऊ नये यासाठी विशेष करून २४ तास कर्मचारी नियुक्त करून मासेमारी होऊ नये मासळीचे संवर्धन व्हावे यासाठी या काळात विशेष लक्ष दिले जात आहे. बोटीतून मासेमारी बंद झाल्याने समुद्रात न जाता किनाऱ्यांवरच कोळी बांधव मासेमारी करत आहेत.विजेचा लपंडाव च्रेवदंडा : वरुणराजाने रविवारी दमदार हजेरी लावली आणि बळीराजासह सारेच सुखावले. आजही पावसाळी वातावरण असून बळीराजा मोठ्या संख्येने शेतावर गेलेला दिसत आहे. मात्र पावसाच्या हजेरीनंतर विजेचा लपंडाव सुरू असून विविध व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. सध्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशाच्या लगबगीत असताना त्यांना झेरॉक्स प्रतीसाठी विजेच्या लपंडावाने प्रतीक्षा करावी लागत आहे. मरु डमध्ये शेतीच्या कामाला वेग१आगरदांडा : मुरुड तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाची दमदार हजेरी लागल्याने शेतकरी सुखावला होता. मे महिन्याच्या अखेरीस जमिनीची मशागत करून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यातच २९ मिमी पाऊस कोसळून दमदार हजेरी लावली होती. २त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने लावलेला राब खराब होण्याच्या मार्गावर होता. शेतकऱ्यांना दुबार पीक करायला लागणार काय असे वाटू लागले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत होती. अखेर मुरुड पंचक्रोशीतील मुस्लीम समाज बांधव वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विशेष नमाज पढणार होते. ३या पावसाने शेतकरी व नागरिक सुखावले. रविवारी शाळांना सुटी असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ मात्र झाली नाही. मुरूडमध्ये सखल भागात काही प्रमाणात पाणी साठले होते. रस्त्यावर असे पाणी साचल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल झाले. वाहनांचा वेग देखील यामुळे कमी झाला होता. च्बोर्ली-मांडला : रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुरु ड तालुक्यातील बोर्ली एसटी स्थानकात सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरु ड यांच्या हलगर्जीमुळे पाणी साचले होते. सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी बोर्ली एसटी स्थानक परिसरात सहा फूट उंच गटाराचे बांधकाम केले होते. या गटारावर काही उपाहारगृहेवाल्यांनी ग्राहकांना येण्यासाठी सिमेंटचे बांधकाम करून रस्ता तयार केला आहे. याच गटारात काही जण कचरा टाकत असतात. कचऱ्यामुळे गटार भरून ते दोन फुटापर्यंत आले आहे.चोवीस तासांत जिल्ह्यातील पर्जन्यमान (मि.मी.मध्ये)रोहा-१७७(१४८),तळा-१०९(१९९), मुरु ड-१०५(१७४), सुधागड-६३(१०१), श्रीवर्धन-४२(१०४), म्हसळा-४१(१११), उरण-३०(१२७), पनवेल-२३(६१), अलिबाग-२१(८१), कर्जत-१३.२(६१.३),महाड-२०(६३), पोलादपूर-१९(८७),पेण-१३(११३.३), खालापूर-६(५१)आणि गिरिस्थान माथेरान-०(१०३).