शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; २९५ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:53 IST

डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण; जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांचीही अवस्था सारखीच

- आविष्कार देसाईअलिबाग : अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच सुदृढ आरोग्य हेदेखील महत्त्वाचे आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दाणादाण उडाली आहे. एक जिल्हा सरकारी रुग्णालय, पाच उपजिल्हा रुग्णालय आणि दहा ग्रामीण रुग्णालयामधील एक हजार १८ मंजूर पदांपैकी तब्बल २९५ पदे रिक्त आहेत. एकट्या जिल्हा सरकारी रुग्णालयामधील ४४४ मंजूर पदांपैकी १७४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येत असून, सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.दर महिन्याला रिक्त पदांचा अहवाल सरकारला पाठवण्यात येतो. राज्यात सरकार अस्तित्वात असताना याकडे लक्ष दिले गेले नाही, आता राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. अलिबाग हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, मुख्य डाक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा कोषागार कार्यालय यासह अन्य महत्त्वाची सरकारी, निम सरकारी कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे २७६ खाटांचे जिल्हा सरकारी रुग्णालयही याच ठिकाणी उभारण्यात आले आहे.जिल्ह्याच्या कानाकोपºयातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये येतात. अलोपॅथी उपचार पद्धतीबरोबरच, आयुष विभागाच्या माध्यमातून उपचार केले जातात. दररोज येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या सुमारे ५०० च्या आसपास आहे. त्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले जाते.या ठिकाणी ४४४ पदे मंजूर करण्यात आली आहेत. पैकी १७४ पदे रिक्त आहेत आणि २६८ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. अपुºया मनुष्यबळामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे.रुग्णांना वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने काहींना जीवही गमवावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वी अलिबाग चावडी मोहल्ला येथील अलमीर रोगे या सहा महिन्यांच्या बालकाचा असाच मृत्यू झाला होता.योग्य आणि वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये अधूनमधून संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. जिल्हा सरकारी रुग्णालय प्रशासनामार्फत आधी तीन महिन्यांतून रिक्त पदाबाबतचा अहवाल पाठवण्यात येत होता. आता मात्र प्रत्येक महिन्याला सरकारला रिक्त पदांबाबत अवगत केले जाते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.सरकार होते तेव्हा त्यांनी लक्ष दिलेले नाही, आता तर राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने असे धोरणात्मक निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. सरकारी रुग्णालयामध्ये गरीब गरजू रुग्ण जास्त प्रमाणात येतात. त्यांच्या व्यथांकडे कोणालाच पाहायला वेळ नाही. त्यामुळे लवकरच जन चळवळीचे आंदोलन उभारून यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आंदोलनाच्या प्रथम टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस जगदीश घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हा सरकारी रुग्णालयाची परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांचीही अवस्था रिक्त पदांमुळे फार वाईट झाली आहे, असे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज शिर्के यांनी सांगितले. सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी उभारण्यात येणाºया आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना सामावून घेणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.उपचाराअभावी बाळाचा मृत्यूजिल्ह्याच्या ठिकाणी असणाºया रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. अपघात विभागातील डॉक्टरलाच अतिदक्षता विभाग सांभाळावा लागत आहे. कमी डॉक्टरांच्या संख्येमुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. यामध्ये तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे, असे अ‍ॅड. रत्नाकर पाटील यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्याने सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.रिक्त पदाबाबत उपसंचालक स्तरावर दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येते आणि हा अहवाल उपसंचालकांमार्फत सरकारला सादर केला जातो. आता वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणे अपेक्षित आहे.- परशुराम धामोडा, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा सरकारी रुग्णालयरुग्णालयाचे नाव                         मंजूर पदे    भरलेली पदे    रिक्त पदे     कार्यरत पदेजिल्हा सरकारी रुग्णालय               ४४४             २७०            १७४              २६८माणगाव उपजिल्हा रुग्णालय          ९६                ७४              २२                 ७१पेण उपजिल्हा रुग्णालय                  ४९                ४४              ०५                 ४१कर्जत उपजिल्हा रुग्णालय              ४७                ४४              ०३                 ४४श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय            ४७                ३३              १४                  ३३रोहे उपजिल्हा रुग्णालय                  ४९                ३४              १५                  ३२उरण ग्रामिण रुग्णालय                    २८                २३              ०५                  २३पनवेल ग्रामीण रुग्णालय                  ३८                २९              ०९                  २९चौक ग्रामीण रुग्णालय                     २७               २३               ०४                  २३कशेळे ग्रामिण रुग्णालय                  २७               २५               ०२                  २५मुरुड ग्रामीण रुग्णालय                    २६               २१                ०५                  २१पोलादपूर ग्रामीण रुग्णालय              २६               १९                ०७                  १८महाड ग्रामीण रुग्णालय                   २७               २३                ०४                  २३महाड ट्रामा केअर युनिट                 ११                ०५                ०६                  ०४जसवली ग्रामीण रुग्णालय               २६                १७               ०९                   १७म्हसळा ग्रामीण रुग्णालय                २५               १४                ११                    १४एकूण                                           १०१८           ६९८             २९५                 ६८६

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल