शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

बंद मोबाइल टाॅवर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, महसूल विभागाच्या शेतकऱ्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:14 IST

महाड तालुक्यात अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाइल टाॅवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली मोहीम सुरू केली आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव :  महाड तालुक्यात अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाइल टाॅवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली मोहीम सुरू केली आहे. या दंडात्मक वसुलीच्या नोटीसा शेतकऱ्यांना देण्यात आल्याने आणि कंपन्यांनी बंद केलेले टाॅवर जागीच पडून राहिल्याने शेतकऱ्यांसाठी हे बंद टाॅवर डोकेदुखीच ठरली आहेत.आर्थिक वर्ष समाप्तीसाठी महसूल विभागाने विनाशेती दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व मोबाइल टाॅवरचादेखील समावेश आहे. जागेचा वापर विनाशेती न करताच व्यावसायिक पद्धतीने होत असल्याने शासनाने या मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली सुरू केली आहे; मात्र महाड तालुक्यात अनेक गावातील मोबाइल टाॅवर गेली अनेक वर्ष बंद आहेत. या मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्या अन्य कंपन्यांमध्ये सामील झाल्या आहेत. मोबाइल टाॅवर बसवताना शेतकऱ्यांबरोबर होत असलेल्या करारनाम्यानुसार शेतकऱ्याला जमीन भाडे दिले जाते.  जमीन विनाशेती केलेली नसल्याने महसूल विभागाकडून शेतकरी आणि मोबाइल टाॅवर कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र महाड तालुक्यात ज्या ठिकाणी मोबाइल टाॅवर बंद झाले आहेत, त्या कंपन्यांकडून शेतकऱ्याला कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आली नाही. अगर जमिनीतील मोबाइल टाॅवर हटवण्यात आलेला नाही. प्रशासनालादेखील याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नसल्याने जमीन वापराबाबत शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. कंपन्यांचे पत्ते बदलण्यात आलेले असल्याने त्यांचा मात्र  संपर्क होत नाही आणि जमीन भाडेदेखील देण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी कात्रीत सापडला  आहे. महाड तालुक्यातील बंद मोबाइल टाॅवरमहाड तालुक्यात जवळपास १५ मोबाइल टाॅवर बंद अवस्थेत आहेत. यामध्ये एअरटेल, रिलायन्स, जी.टी.एल., टाटा मोबाइल या कंपन्यांचे महाड शहर, शिरगाव, बारसगाव, टोळ बु., वहूर, दासगाव, गावडी, झोळीचाकोंड, काचले, कोतुर्डे, करंजाडी, लोखंडेकोंड यांचा समावेश आहे. या बंद टाॅवरमुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा दंड थकीत आहे. गव्हाडी गावातील टाॅवरकडून सुमारे १,९३,८४०, महाडमधील टाॅवरकडून २,०१,६८०, दासगाव टाॅवरकडून १,९९,७२०, टोळ बु.मधील टाॅवरकडून ४,७३,९२० रुपये वसूल होणे आहेत. कंपनीमालक आणि शेतकरी दोघांनादेखील नोटीसा देण्यात येतात, असे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी सांगितले. या नोटीसा प्राप्त होताच शेतकऱ्यांना धक्का बसतो; मात्र कंपन्या दाद देत नसल्याने गेली तीन ते चार वर्षांची थकबाकी राहिली आहे. गेली तीन वर्षांपासून माझ्या जमिनीमधील मोबाइल टाॅवर बंद आहे. कंपनीच्या लोकांशी संपर्क होत नाही. कंपनीने जमीन भाडेदेखील दिलेले नाही आणि विनाशेती वापर दंडदेखील भरलेला नाही, यामुळे महाड महसूल विभागाकडून आम्हाला नोटीसा येत आहेत.– लक्ष्मण अंबावले शेतकरी गाव गव्हाडी, 

टॅग्स :MobileमोबाइलRaigadरायगड