शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 05:06 IST

जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे. अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी

- मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे.अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी, अथवा अन्य ठिकाणी पुनश्च पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मागील ३२ वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. पुनर्वसन करण्याच्या मागणीवर मागील तीन तप नुसत्याच चर्चा, बैठका सुरू आहेत.घेण्यासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी फेर पुनर्वसनाची मागणी जेएनपीटी, सिडको केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. या फेर पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकार बरोबर पत्रव्यवहार केला आहे. अनेकदा चर्चाही झाल्या आहेत, अनेक बैठकाही पार पडल्या आहेत.अनेक वर्षांपासून शासनाचे उंबरठेही झिजवून झाले आहेत. त्यानंतर कें द्र सरकारने गावाच्या पुनर्वसनासाठी ५ कोटी ६९ लाख रुपये मंजूरही केलेले आहेत. मात्र, त्यानंतरही हनुमान कोळीवाडा गाव पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे.जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा आणि शेवा ही दोन गावे विस्थापित करण्यात आली आहेत. १९८५ साली जेएनपीटी बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन उरण शहरानजीक असलेल्या बोरी-पाखाडी (भवरा) गावाजवळ करण्यात आले. चिखल आणि वाळवीग्रस्त मातीच्या जागेत भराव करून नव्याने हनुमान कोळीवाडा गाव उभारण्यात आले आहे. पुनर्वसन करताना ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार जमीनही उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अपुऱ्या जागेत उभारण्यात आलेल्या घरातच ग्रामस्थ दाटीवाटीने राहत आहेत. हनुमान कोळीवाडा गावात वास्तव्यासाठी आलेल्या १०५ कुटुंबासाठी सव्वासहा हेक्टर जागा पुनर्वसनासाठी आवश्यक होती. त्यासाठी जेएनपीटीने जागा आरक्षितही ठेवली आहे. मात्र, पुनर्वसन करताना फक्त दोन हेक्टर जागेतच पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करण्यात आलेल्या १०५ घरांच्या वस्तीच्या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले आहे.वाळवीमुळे ग्रामस्थांना घरात वास्तव्य करणेही कठीण होऊन बसले आहे. गावातील अनेक कुटुंब गाव सोडून गेली आहेत. काही गावाबाहेर भाड्याने राहत आहेत, तर घरभाडे परवडत नसल्याने आणि मासेमारीच उपजीविकेचे साधन बनलेली उर्वरित अनेक कुटुंबे वाळवीग्रस्त घरातच जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत.अनेक वर्षांपासून हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक जागा गावाशेजारीच उपलब्ध आहे. मात्र, पुनर्वसनाच्या आड स्थानिक राजकारण येत आहे. काही स्थानिक राजकीय नेतेच जेएनपीटी, सिडको आणि राज्य सरकारमध्ये दलालीचे काम करीत आहेत.- गौरव कोळी,सरपंच, हनुमान कोळीवाडाहनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाच्या कामावर खर्च कुणी करावा, यावरच जेएनपीटी, सिडको, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे, अशी जागा जेएनपीटी परिसरात उपलब्ध नाही. गावाशेजारी आवश्यक जागा उपलब्ध असतानाही मागील ३२ वर्षांपासून पुनर्वसनापासून केंद्र व राज्य सरकारने वंचित ठेवले आहे.- नरेश कोळी, अध्यक्ष, ग्रामविकास मंडळगावाच्या पुनर्वसनासाठी जेएनपीटीकडे जागा उपलब्ध आहे. मात्र, जागेचा निर्णय घेण्यास जेएनपीटी चालढकलपणा करीत आहे. जेएनपीटीमुळेच पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहिला आहे.- जयवंत कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा

टॅग्स :Raigadरायगड