शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनास दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 02:51 IST

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती.

अलिबाग : प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. जिल्हा प्रशासनाने आंदोलकांची अडचण होऊ नये, यासाठी निवेदन घेण्याची व्यवस्था केली होती. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेसने सुट्टीच्याच दिवशी आंदोलने केली होती. त्यात आता शिक्षकांच्या आंदोलनाची भर पडली आहे.सकाळी ११.३०च्या सुमारास शहरातील क्र ीडाभुवन येथून शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने आपला मूक मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हिराकोट तलावाजवळ अडविल्याने त्यांनी दोरदार घोषणाबाजी करण्यास सुरु वात केली. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केले. निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करण्यात यावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाइन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळाली पाहिजे; परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, म्हणून २७ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयात आवश्यक त्या दुरु स्त्या व सुधारणा करून बदल्या मे २०१८मध्ये करण्यात याव्यात, एमएससीआयटीसाठी मार्च २०१८पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने सर्वच शैक्षणिक उपक्र म आणि शिक्षकांची मेहनत वाया जात आहे. प्राथमिक शैक्षणिक उपक्रमाचे विविध प्रयोग राबविण्याचे फर्मान म्हणजे सरकारचे चुकीचे धोरण आहे. तसेच सरकार सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके देत आहे. पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत शासन दुजाभाव करीत नाही; परंतु गणवेश वाटपात मात्र शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला. या वेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, सोपान चांदे आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.शासनाची संकल्पना योग्यशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन राबवत असलेल्या संकल्पना योग्य आहेत. या संकल्पना राबविण्यासाठी शिक्षकांना संधी देणे गरजेचे असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. शिक्षणाबाबतचे शासन निर्णय बदलत असल्याने शिक्षकांची मेहनत वाया जातेय.

टॅग्स :Teacherशिक्षक