नववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:41 AM2018-12-15T00:41:21+5:302018-12-15T00:41:42+5:30

नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

Gram panchayat dhamdhoom elections in the district early in the year | नववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम

नववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम

अलिबाग : नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल नेमका कोणत्या पक्षाकडे अधिक आहे, हे कळू शकेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच वर्षामध्ये पार पडणार आहेत. त्याच धामधूममध्ये जिल्ह्यातील ९७ ग्रमपंचायतींची मुदत मार्च ते जून २०१९ या कालावधीमध्ये संपत आहे. निवडणूक विभागाकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी २०१९ वर्षे हे निवडणुकांचे वर्ष आहे. मेमध्ये लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. रायगड जिल्ह्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ९७ ग्रमपंचायतींची मुदत येत्या मार्च ते जून या कालावधीमध्ये पूर्ण होत आहे. त्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील २५, मुरुड - ३, पेण- ५, पनवेल- ५, उरण-१, कर्जत- ३, खालापूर- १, माणगाव- ११, तळा- ५, रोहा- ६, महाड- १७, श्रीवर्धन- ११ आणि म्हसळा तालुक्यातील चार अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सरपंचपदाची थेट निवडणूक सुरू झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष दक्ष झाले आहेत. त्यांनी राजकीय व्यूहरचनेमध्ये बदल करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. सरपंचाला असलेले भक्कम अधिकार, मतदारांमधून होणाऱ्या थेट निवडीमुळे सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी राजकीय पक्षातील उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच वाढली आहे. मतदारच आपल्या आवडीचा सरपंच थेट निवडून देत असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांना इच्छुकांचे मन वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकांकडे पाहिल्यास विविध राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर सोयीस्कर युत्या आघाड्या केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना चांगलेच यश आल्याने आगामी निवडणुकीसाठी हाच फॉर्म्युला राहण्याची शक्यता बळावली आहे. ग्रामपंचायतींमध्ये मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. १७ डिसेंबर २०१८ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे, असे निवडणूक विभागाचे रवींद्र मठपती यांनी सांगितले.

Web Title: Gram panchayat dhamdhoom elections in the district early in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.