शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता ५७ जणांना मृत घोषित करण्याचा शासनाला प्रस्ताव; इर्शाळवाडीतील पीडितांना सरकारच्या मंजुरीनंतर मदत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 06:43 IST

मृत जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कायार्लयाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

अलिबाग :   इर्शाळवाडीतील आदिवासी वाडीवरील दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याची भीती व्यक्त होणाऱ्या व शोध न लागलेल्या ५७ जणांना बेपत्ता घोषित करण्यात आले आहे. त्यांना मृत जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कायार्लयाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. सरकारच्या मंजुरीनंतर संबंधितांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळण्याचा मार्ग  मोकळा  होणार  आहे. प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेला किमान महिनाभराचा अवधी लागण्याची शक्यता  अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. 

 इर्शाळवाडीत १९ जुलैला रात्री दरड कोसळून झालेल्या  दुर्घटनेत २७ जणांचे मृतदेह मिळाले. चार दिवसांत सुमारे ६० तास शोधकार्य सुरू होते. मात्र मुसळधार पावसामुळे सर्वत्र झालेला चिखल आणि अन्य कोणतीही उपकरणे  घटनास्थळी नेण्याची सुविधा नसल्याने रविवारी सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली. या  दुर्घटनेतून १४४ वाचले आहेत. यापैकी अनेकजण घटनेच्या रात्रीच स्वत: घरातून डोंगराच्या पायथ्याशी पळत आले होते. अनेक जण जखमी झाले होते. त्यांच्यावर  उपचार करण्यात आले. बहुतांश जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

दुर्घटनेत एकूण २७ मृतदेह मिळाले असून,  ५७ जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ढिगाऱ्याखाली ते दबले गेले असल्याची शक्यता असून, त्यांचे वाचणे अशक्यप्राय असल्याने त्यांना मृत घोषित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. 

शासनाकडून मृत म्हणून घोषणा केल्यानंतर पुढील नुकसान मदतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरडीखालून काढलेल्या २७ मृतदेहांच्या वारसांना पाच लाखांची मदत प्रशासनाकडून  येत्या दोन दिवसांत दिली जाणार असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.

३२ कंटेनरमध्ये तात्पुरता निवारा

दुर्घटनेतील १४४ जण सुखरूप आहेत. निर्वासित झालेल्या कुटुंबांसाठी चौक येथे ३२ कंटेनर घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. या कंटेनरमध्ये कपडे, अंथरुण, गृहोपयोगी वस्तू, तीन महिने पुरेल एवढे रेशन, वीज, पाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. निर्वासित झालेले आदिवासी कुटुंब कंटेनरमध्ये वास्तव्यास आहेत.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण