शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने गरिबांच्या तोंडचा घास पळवला; चित्रा वाघ यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:31 IST

गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

नवी मुंबई : महागाई कमी करू, महिलांना सुरक्षा देऊ, रोजगारनिर्मिती, बेरोजगारी कमी करू आदी मुद्दे या सरकारने निवडणूक काळात मांडून जनतेसमोर एक वेगळे चित्र निर्माण केले होते. गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे रविवारी नवी मुंबई जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.हे सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटीभर काम केल्याचे सांगत आहेत; परंतु या सरकारचे वाटीभरही काम झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने दिलेल्या आश्वासनांची सत्यता नागरिकांच्या लक्षात येऊ लागली असून, सरकारने फसवणूक केल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या दिवसांत याचे उत्तर जनता राज्य सरकारला दिल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत फिरत असताना कर्जमाफी मिळालेले शेतकरी आढळले नसून, शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या. या मेळाव्याला माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार आदी उपस्थित होते.खोटे बोलणे या सरकारचा धंदाया सरकारने आमच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचे सरकार आहे. जे आरोप केले त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही ही वस्तुस्थिती असून, खोटे बोला; पण रेटून बोला, हा या सरकारचा धंदा असल्याचा आरोप वाघ यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी