शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार असंवेदनशील - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:52 IST

गेल्या २० दिवसांपासून कोकणासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात राज्य सरकार तोकडे पडत आहे.

महाड : गेल्या २० दिवसांपासून कोकणासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात राज्य सरकार तोकडे पडत आहे. यावरून सरकारची पूरग्रस्तांबाबत असंवेदनशीलता दिसून येत असल्याचा आरोप रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला.महाडमधील पूरस्थितीची तटकरे यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी आ. माणिक जगताप, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदी उपस्थित होते. पूर ओसरल्यावर केवळ दोन दिवसांत महाड शहरात नगरपरिषदेने केलेल्या स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आपद्ग्रस्तांना मदत देण्यासाठी २००५ च्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी. त्या वेळी विलासराव देशमुख सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आपद्ग्रस्तांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्याच्या चारपट नुकसानभरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. पूर ओसरून आज पाच दिवस झाले तरी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचली नाही. पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याचे तटकरेंनी नमूद केले.महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री योग्य वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली जाईल, असे सांगतात. हे जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला. सरकारच्या मनात दानत असेल तर सर्वकाही शक्य आहे.२००५ मध्ये दरडी कोसळून स्थलांतर केलेल्या दासगाव येथील दरडग्रस्तांंना अद्यापही घरांसाठी उर्वरित निधी मिळालेला नाही. हा निधी त्वरित द्यावा, अशा सूचना खा. तटकरे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिल्या. कमकुवत झालेल्या दादली पुलाची दुरुस्ती न करता नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तटकरे यांनी या वेळी केली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड