अलिबाग : माणगाव तालुक्यातील कशेणे गावातील एका गुंडाला तालुका हद्दपारीचा आदेश रायगड पोलिसांनी बजावलेला होता. हा आदेश धाब्यावर बसवून माणगाव- इंदापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये राहिलेल्या गुंडास सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास माणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन पहाटे अटक केली. याबाबतची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या या गुंडास, माणगाव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये या कारणास्तव माणगाव तालुक्यामध्ये प्रवेशबंदी केली होती. हा हद्दपारीचा आदेश त्यास माहीत असताना देखील तो माणगाव-इंदापूर रोडवरील हॉटेलमध्ये सापडला आहे.
हद्दपारीचा आदेश झुगारणारा गुंड गजाआड
By admin | Updated: February 22, 2017 06:41 IST