शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या विचारांचे रोपण आवश्यक

By admin | Updated: February 23, 2016 02:18 IST

चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची

पनवेल : चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची तमा नसते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्यामिशनचे प्रल्हाद पै यांनी केले. पनवेल येथील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात रविवारी लोकमत व पनवेल नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जीवन विद्या मिशन परिवाराच्या गौरव व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन विद्या मिशनच्या कार्याबद्दल पै यांना मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, शिवसेना नगरसेवक रमेश गुडेकर, बांधकाम सभापती राजू सोनी, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष प्रदीप सुभेदार, सचिव आनंद राणे, कोषाध्यक्ष उमेश पांगम, प्रभाकर उंडे, तुषार राणे, सुनील मोरे, निरंजन खवळे, संतोष सावंत, लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत ठाणेचे साहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेठ, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. कार्यक्र माची सुरु वात जीवन विद्या मिशनच्या कार्याची माहिती देणाऱ्या ध्वनिचित्रफितीतून करण्यात आली. यानंतर लोकमतने दिलेल्या पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात पै यांनी आठवणींना उजाळा दिला. २००६ मध्ये नाशिक येथे लोकमत व जीवन विद्या मिशन यांचे एकमत झाले तर क्र ांती होईल, असे उद्गार सद्गुरू वामनराव पै यांनी काढले होते. लोकमतने जीवन विद्या मिशन परिवाराला पुरस्कार देवून गौरवले आहे. त्यामुळे हे नाते आणखी दृढ होत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे लोकमतने जीवन विद्या मिशनच्या ६० वर्षांच्या कार्याची दखल घेतल्याची पावती आहे. लोकमत हे वाचनीय वृत्तपत्र असून, राज्यभरात लोकमत चांगले काम करीत असून, वाचकांची संख्या २० लाखांच्या वर असल्याचे सांगत लोकमतच्या सखी मंच, दीपोत्सव, कालदर्शिका आदी उपक्रमांचीदेखील पै यांनी भरभरून स्तुती केली. (प्रतिनिधी)शिस्तबद्ध कार्यक्र मात हजारोंची उपस्थितीकार्यक्रमाला पनवेलकरांबरोबरच ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईमधील हजारो सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने पार पडलेला या कार्यक्रमात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवन विद्या मिशनच्या घोषवाक्याची प्रचिती आली. पै यांनी लोकमतच्या ‘काहीतरी कर पनवेलकर’ या उपक्रमाचेही कौतुक केले. माध्यम समाजातील महत्त्वाचा घटकसमाजात चांगल्या गोष्टीही घडत असतात. त्या दाखविण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. मागील काळात बुवाबाजीवर खूप टीका झाली. मात्र सर्वच आध्यात्मिक संघटनांना यामध्ये गृहीत धरता येणार नाही. सध्या वैचारिक प्रदूषणही वाढत आहे, त्यावर चांगल्या विचारांनी मात होऊ शकते. माध्यमांनी याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला पै यांनी दिला.