शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

गोंदाव आदिवासींची पाली तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:04 IST

निवडणुकीवर बहिष्काराचा निर्धार; विविध मागण्यांसाठी मोर्चा

पाली : सुधागड तालुक्यातील गोंदाव आदिवासीवाडीतील ग्रामस्थ विविध प्रश्न व समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध शासन योजनांपासून वंचित राहावे लागल्याने आदिवासी समाज बांधवांच्या प्रगती व विकासाला खीळ बसली आहे. अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला व दाखल्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी बुधवारी पाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व प्रशासनाविरोधातील आपला संताप व्यक्त केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा एकमुखी निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.गोंदाव आदिवासीवाडीतील आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याच्या ६७ वर्षाचा काळ उलटूनही मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासन योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखल्यापासून आदिवासी समाज बांधव मागील अनेक वर्षांपासून वंचित राहिले आहेत. परिणामी, आदिवासी कातकरी समाजाला उत्कर्षासाठी असलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्या असल्याचा संताप उपस्थित आदिवासी कातकरी समाज बांधवांनी व्यक्त केला.लय भारी आदिवासी सामाजिक विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. लता कळंबे यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव आजही मूलभूत सुविधा व शासनाच्या महत्त्वाच्या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. आवश्यक दाखले नसल्याने त्यांना मोठ्या अडचणी व समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी समाज बांधवांचा सर्वांगीण विकास साधला जावा या दृष्टीने शासन योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. गोंदावसह अन्य आदिवासीवाड्या-पाड्यातील नागरिकांना लवकरात लवकर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.तसेच आदिवासी कातकरी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांची व्यथा मांडताना दऱ्याखोºयात रानावनात वसलेला समाजबांधव देशाला स्वातंत्र्य मिळूनही अजूनही पारतंत्र्यात जगत आहे. विकासाचा स्रोत वाड्या-वस्त्यात पोहोचत नाही. कष्टप्रद व हलाखीचे जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे. जीवन-मरणासाठी संघर्ष करीत आहे असे म्हटले. या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिला, पुरुष व विद्यार्थ्यांनी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्यासमोर गाºहाणे मांडले. या वेळी हाडक्या वाघमारे, श्रावण वाघमारे, कुशा वाघमारे, सुरेश वाघमारे, धाकी वाघमारे, बेबी वाघमारे, मंदा वाघमारे, कुसुम वाघमारे आदीसह आदिवासी कातकरी समाज बांधव उपस्थित होते.प्रश्न सोडवण्यासाठी ५ नोव्हेंबरला बैठकया वेळी तहसीलदार रायन्नावार यांनी आदिवासी समाज बांधवांच्या समस्या समजावून घेत आचारसंहिता असून निवडणुकीची तयारी सुरू आहे. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी गोंदाव आदिवासीवाडीवर सर्व शासकीय प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत बैठक लावली जाईल व आदिवासी बांधवांचे प्रश्न व समस्यांची सोडवणूक केली जाईल, असे आश्वासित केले.

टॅग्स :agitationआंदोलन