शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
2
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
3
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
4
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
5
गुंतवणूकदारांची पळापळ! सलग घसरणीने बाजार हादरला; ५ कारणांमुळे बाजारात आली मंदीची लाट
6
सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम
7
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..." 
8
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
9
१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
10
Travel : शाहरुख खानच्या गाण्यांमध्ये दिसणारे स्वित्झर्लंडमधील 'ते' ठिकाण नक्की कुठे आहे? कसे जाल?
11
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
12
Ruturaj Gaikwad Record: टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला
13
५ वर्षांचं प्रेम, लग्नानंतर बायकोला शिकवलं, पोलीस अधिकारी बनवलं; आता नवऱ्यावरच केला आरोप
14
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
15
"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? आगामी सिनेमाशी आहे कनेक्शन
16
४ राजयोगात २०२६ची पहिली कालाष्टमी: ९ राशींवर महादेव-लक्ष्मी कृपा, चौपट लाभ; कल्याण-मंगल योग!
17
घसरत्या बाजारातही रॉकेट बनलाय हा स्मॉलकॅप शेअर; ५७००% पेक्षाही अधिक आलीये तेजी
18
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
19
Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव शहराच्या पूर्व-पश्चिम भागांत रंगणार दुरंगी लढती,आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला
20
रस्त्यात जखमी दुचाकीस्वाराला पाहताच अजित पवारांनी केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २०० कोटींचे पॅकेज द्या; मच्छीमारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:22 IST

मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिले निवेदन

अलिबाग : अवकाळी पाऊस, क्यार आणि महाचक्रिवादळामुळे रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणारे, तसेच त्याच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने आर्थिक पॅकेज मंजूर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाने केली आहे. तसे निवेदन त्यांनी राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांना गुरुवारी दिले.राज्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने दहा हजार कोटी रु पयांची तरतूद केली आहे. मात्र, क्यार वादळ आणि महाचक्रिवादळामुळे मच्छीमारांच्या नुकसानभरपाईबाबत अद्याप कोणतीही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुदातील क्यार आणि महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाºयांना मासेमारी करण्यासाठी जाताच आलेले नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.जिल्ह्यामध्ये एक नौका सहा सिलिंडर व बिगर यांत्रिकी नौकांची संख्याही तीन हजार ४५५ आहे. त्यांचे सुमारे १२७ कोटी दहा लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मच्छीविक्रेतींची संख्या ही सात हजार ४७७ आहे. त्यांचे २० कोटी ७६ लाख २५ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच मच्छी सुकवणारे (महिला) तीन हजार ८१२ अशी संख्या आहे. त्यांना नऊ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांचा फटका बसला आहे.जिल्ह्यात आठ हजार २३९ खलाशांचे ३४ कोटी ५४ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य कामगार आणि जाळी विणणाºया दोन हजार ३६४ जणांना चार कोटी ७९ लाख १६ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. असे एकूण १९६ कोटी ४८ लाख २१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे, असे निवेदनात रायगड जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी नमूद केले आहे.सरकारने मच्छीमार समाजाला न्याय द्यावा, तरच त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे, अलिबाग मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय तांडेल, संचालक सत्यजित पेरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :fishermanमच्छीमार