शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

माथेरान प्रवेशद्वारावरील गेट सील, अवैध वाहतूक रोखण्यासाठी नगरपालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 04:11 IST

माथेरानमध्ये असलेल्या वाहनबंदी कायद्याचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ पाहता, माथेरान नगरपालिकेने माथेरानच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही गेट सील केली आहेत.

माथेरान : माथेरानमध्ये असलेल्या वाहनबंदी कायद्याचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ पाहता, माथेरान नगरपालिकेने माथेरानच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही गेट सील केली आहेत. यामुळे अवैध वाहतुकीस तर आळा बसेल; पण येथील अत्यावश्यक सेवा म्हणून असलेल्या रुग्णवाहिकेस मात्र अडचणीचे ठरणार आहे.माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाण आहे. येथे पूर्ण वाहनबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे माथेरानमध्ये फक्त रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना परवानगी आहे. तसेच येथे वाहनप्रवेशास बंदी आहे. येथील स्थानिक अश्वपाल संघटना वाहनबंदीसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे, त्यांनी वाहन प्रवेशास नेहमीच प्रखर विरोध दर्शविला आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून माथेरानमध्ये एमएमआरडीच्या माध्यमातून येथील रस्ते व प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यात वाहन कायदा मोडला गेल्याची अश्वपाल संघटनेने तक्र ार केली आहे. त्यानंतरही वाहने गावात येत असल्याचे बोलले जात आहे. आज माथेरानमध्ये येथील मायरा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, हार्ट पॉइंट व गावातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. गावातील रस्त्यांवर स्थानिकांचे लक्ष असते. मात्र, पॅनोरमा पॉइंट येथे थेट वाहनातून कच्च्या मालाची वाहतूक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून ज्या ठिकाणावरून ही वाहतूक होते तिथे कायमस्वरूपी नगरपालिकेने एक कर्मचारी नियुक्त केलेला आहे, तरीही ही वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.दस्तुरीनाका येथील दोन्ही गेट पालिकेने सील केल्यामुळे तात्पुरता हा प्रश्न मिटणार आहे; परंतु हे गेट अर्धवट आहेत, त्यामुळे पूर्णस्वरूपी हा तोडगा नसून येथे भव्य गेट उभारून कायमस्वरूपी कर्मचारी असायला हवा, अवैध मालवाहतूक करणाऱ्यांवर पालिकेने पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे; पण माथेरान पालिकेने फक्त औपचारिकता दाखवून अंग झटकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने हे गेट सील केल्यामुळे येथील अत्यावश्यक सेवा असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला त्याचा फटका बसणार आहे, तसेच परिणामी स्थानिक नागरिकांना त्रास होणार आहे.वारंवार होतेय कायद्याचे उल्लंघनमाथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे, येथील गारवा टिकावा आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी येथे वाहन बंदी कायदा येथे लागू करण्यात आला आहे. मात्र, या कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याने नगरपालिके ने प्रवेशद्वारावरील गेट सील के ले आहे.अवैध वाहतूक रोखण्याकरिता पालिकेने हे पाऊल उचलले असून, रुग्णवाहिकेसाठी हा कायदा शिथिल होईल; पण वाहनबंदी कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, माथेरान

टॅग्स :Raigadरायगड