शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अंशुल स्पेशालिटी मॉलिक्यूल लि. कंपनीत वायुगळती; तिघांना त्रास, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 15:27 IST

आमदार अनिकेत तटकरे यांनी कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आम्ही ही बाब सांगणारच होतो, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

धाटाव - एमआयडीसीमध्ये वायुगळती होऊन तीन कामगारांना त्रास झाला. त्यांना डॉ. जाधव हॉस्पिटल रोहा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार अनिकेत तटकरे यांनी तत्काळ कंपनी प्रशासनाकडे संपर्क साधला. कंपनी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. तेथील कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, झालेल्या दुर्घटनेबाबत कंपनी प्रशासन गंभीर दिसले नाही. यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी रोहा येथील डॉक्टर जाधव यांच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कामगारांची चौकशी केली. तेथे दोनच कामगार उपचार घेताना दिसले. तर तिसऱ्या कामगाराबद्दल विचारणा केली असता सदर कामगार अत्यवस्थ असल्याने त्याला पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असल्याचे समजले. महत्वाचे म्हणजे कंपनी प्रशासन ही बाब लपवत असल्याचे दिसून आले.

आमदार अनिकेत तटकरे यांनी कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आम्ही ही बाब सांगणारच होतो, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. खरे तर, अशी दुर्घटना होऊ नये म्हणून कंपनी प्रशासनाने या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असताना कंपनी प्रशासन या बाबतीत गंभीर नसेल आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी, अशा प्रकारचा खेळ होणार असेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण कदापि सहन करणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कंपनीमध्ये अशाच प्रकारची दुर्घटना होऊन ११ कामगारांना त्रास झाला होता, यावेळीसुद्धा आमदार अनिकेत तटकरे यांनी हॉस्पिटलला भेट दिली होती. तेंव्हाही कंपनी प्रशासनाने आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ, यापुढे, अशी घटना होणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा तशीच दुर्घटना होते आणि कंपनी प्रशासन त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करते, हा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कारण एखादी मोठी दुर्घटना घडली तर कामगारांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही त्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कंपनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे अनेक कामगार व नागरिकांचा जीव टांगणीला ठेवणे आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जाईल. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या कंपनी प्रशासनावर  कठोर कारवाई करण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :RaigadरायगडMIDCएमआयडीसीEmployeeकर्मचारी