शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

महाड MIDC मधील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत वायुगळती, सात कामगारांना बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 22:13 IST

Mahad MIDC : वायू गळती थांबविण्यात यश आले असून वायुगळती नेमकी कशामुळे झाली याचा खुलासा कंपनी व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेला नाही.

 - दीपक साळुंखे 

बिरवाडी : महाड एमआयडीसी मधील प्लॉट नंबर ई 6 वरील इंडो अमाईन्स लिमिटेड कारखान्यांमध्ये  एच टू एस  (हायड्रोजन सल्फाइड) या मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या वायूची गळती झाल्याने कारखान्यातील सात कामगार बाधित झाल्याची घटना गुरुवार 21 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी  6:15 वा  घडली आहे.

याबाबत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील कारखान्यातील एच टु एस या वायूच्या गळतीमुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार बाधित झाले असून  नायर या कामगारांची प्रकृती चिंताजनक होती मात्र  या कामगारांना महाड शहरातील देशमुख हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचाराकरिता ठेवण्यात आले असून उपचारानंतर कामगारांची प्रकृती स्थिर आहे. वायू गळती थांबविण्यात यश आले असून वायुगळती नेमकी कशामुळे झाली याचा खुलासा कंपनी व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेला नाही. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कंपनीचे व्यवस्थापक जयप्रकाश शेट्टी यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते उपलब्ध न झाल्याने या प्रकाराबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

या कारखान्यात यापूर्वीदेखील अनेक अपघात होऊन कामगार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत  वारंवार घडणार्या अपघातांमुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारखानदारांना  राजकीय पाठबळ असल्याने  प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखाना निरीक्षक   यांच्याकडून कारवाई करण्यास कुचराई होत असल्याची चर्चा  या दुर्घटनेनंतर कामगार वर्गामध्ये सुरू झाली आहे  .

दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण ...घटनेचे गांभीर्य ओळखून  महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे  यांनी उपचार सुरू असलेल्या कामगारांच्या  प्रकृतीची विचारपूस करीत  रुग्णालयात तसेच  घटनास्थळी भेट देऊन  परिस्थितीचा आढावा  घेतला  .   महाड एमआयडीसी मधील इंडो अमाईन्स कंपनीतील  वायुगळतीमुळे बाधित झालेले कामगार  उत्तम किसन पवार (वय 49), तेजस विजय चाळके (वय 25) रा. आदे,  जयराम चंद्रकांत चौधरी (वय 25) रा. वडघर, पंकज कुमार, सोहम महातो (वय 25) रा. छपरा बिहार,  पप्पू कमल महातो (वय 25) रा. छपरा बिहार, रजनीकांत नायर (वय 34) रा. कवेआळि,  दत्तात्रय रावसाहेब कोल्हे (वय 39) रा. इंडो अमाइन्स कॉलनी यांचा समावेश आहे.

टॅग्स :RaigadरायगडMIDCएमआयडीसी