शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चक्रीवादळाच्या प्रकोपात बागायतदार आडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 01:54 IST

६६ हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका; विशेष आर्थिक पॅकेजची मागणी

आविष्कार देसाई

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यातील सुमारे ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नारळ सुपारीसह आंबा, काजूच्या फळबागा पुरत्या झोपल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे न भरुन येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी होत आहे.

भारतीय अर्थ व्यवस्थेची चक्रे अधिक गतीमान होण्यासाठी उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अर्थ व्यवस्थेचे दुसरे चाक कोलमडून पडले आहे. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी, आंबा, काजूंच्या बागा या अशरक्ष: भूईसपाट झाल्या आहेत. अलिबाग, मुरुड, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. वर्षानुवर्षे संगोपन केलेली झाडे नजरेच्या समोर भूईसपाट होताना पाहण्यावाचून बागायतदार शेतकºयांसमोर कोणताच पर्याय नव्हता. वादळाने तडाखा दिल्याने सर्व तयार झालेले आंबे खाली कोसळले. तशीच स्थिती नारळ, सुपारी, काजूंच्या बागांची झाली आहे.

रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नारळ-सुपारी विविध राज्यांमध्ये पाठवण्यात येतात. पण वादळामध्ये बागांचे मोठे नुकसान झाल्याने नारळ, सुपारी बागायतदारांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती मुरुड तालुक्यातील शेतकरी विनोद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. सरकार आम्हाला मदत करेलही मात्र ती तुटपूंजी असणार आहे. कारण एक झाड किमान २० वर्षे फळ देते. त्यामुळे एकदाच मदत मिळून उपयोग होणार नाही. यासाठी सरकारने सरासरी काढून विशेष आर्थिक नुकसान भरपाई दिल्यास वादळात फटका बसलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.निसर्ग चक्रीवादळामुळे येथील शेती, नारळ, सुपारी, काजू, आंबा या बागायती उध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिक्षक, अधिकारी, रायगडनिसर्ग चक्रीवादळाने संबंध कोकणातील शेती आणि बागायची भूईसापट केल्या आहेत. मोठ्या संख्येने घर, विजेच खांब, विज जनित्र यांचेही नुकसान झाले आहे. रायगडातील नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी कोकणाला पाच हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - खासदार सुनील तटकरे, रायगडआंबा बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसानझाडाला लागलेले आंबे खाली उतरवणे बाकी असतानाच वादळाने आमच्या बागा उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे, मजुरी, मशागत अशा सर्व गोष्टीच वाया गेल्या आहेत, असे अलिबाग-शेखाचे गाव येथील आंबा बागायतदार परेश म्हात्रे यांनी सांगितेल.बागेतील आंब्याची झाडे जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे कायम स्वरुपी उत्पादन देणारे झाड दगावले आहे. सरकारने विशेष आर्थिक नुकसान भरपाई देताना याचाही विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे केले तरच बागायतदार तग धरु शकतील अन्यथा बागांप्रमाणे तेही कमरेतून मोडून पडतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.रायगडमधील बागायतीचे क्षेत्र : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ हजार हेक्टरवर नारळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच नऊ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये सुपारीचे पीक घेतले जाते. सुमारे २६ हजार हेक्टरवर आंब्याची लागवड होते, तर तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर काजूची शेती केली जाते.

टॅग्स :Raigadरायगडcycloneचक्रीवादळ