शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

गाईच्या शेणापासून साकारल्या गणेशमूर्ती; पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 06:20 IST

पंचगव्य चिकित्सालयाचा अभिनव उपक्रम

पनवेल : खारघरमध्ये गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करण्याचा अभिनव उपक्रम पंचगव्य चिकित्सालयमार्फत राबविण्यात आला आहे. पंचगव्य व कर्करोगतज्ज्ञ डॉ. नवनाथ दुधाळ यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलेला आहे. देशी गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत.

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असून, शासनाच्या मार्फतही पर्यावरणपूरक व शाडूच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले जाते. पीओपीच्या गणेशमूर्ती पर्यावरणाला घातक असतात. अशा परिस्थितीत शेणापासून तयार केलेल्या या मूर्ती पर्यावरणपूरक आहेत. विशेष म्हणजे, या मूर्तींचे विसर्जन राहत्या घरी, कुंडीमध्ये करता येऊ शकते.

विसर्जनानंतर मूर्ती शेणखत म्हणून काम करील, असा दावाही डॉ. नवनाथ दुधाळ यांनी केला आहे. सध्याच्या घडीला ४० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशाप्रकारे शेणापासून तयार केलेल्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षणही डॉ. दुधाळ देणार आहेत. स्वयंरोजगार व मेक इन इंडियाला साजेसा असा हा उपक्रम आहे. अनेकांना यापासून रोजगारनिर्मिती होईल व स्वदेशीचा प्रचार होईल, अशी धारणा यामागे दुधाळ यांची आहे. डॉ. दुधाळ यांनी अनेक वर्षे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये सहायक शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.

इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना मागणीपर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन, प्लॅस्टिक बंदी सारखे अभियान राबविले जात आहेत. त्यामुळेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्तींची मागणी भक्तांकडून वाढली आहे. याशिवाय बाप्पाच्या सजावटीतही इकोफ्रेंडली साहित्याचा वापर होऊ लागला आहे. आत डॉ. नवनाथ दुधाळ यांनी गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.

टॅग्स :ganpatiगणपती