शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

गणपती गेले गावाला...

By admin | Updated: September 22, 2015 03:49 IST

ढोलताशाच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. ९० सार्वजनिक आणि ५३ हजार ५११ घरगुती गौरी-गणपतींचा त्यामध्ये समावेश होता.

अलिबाग : ढोलताशाच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. ९० सार्वजनिक आणि ५३ हजार ५११ घरगुती गौरी-गणपतींचा त्यामध्ये समावेश होता.दुपारनंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची पावले समुद्रकिनारी, नदी, तलाव या दिशेने निघाली. सायंकाळनंतर त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्याने तेथे जत्रेचे स्वरूप आले होते. आबालवृद्धांनी बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये एकच गर्दी केली होती. ढोलताशासह डीजेच्या तालावर तरुणाईची पावले थिरकत होती. काहींनी टाळ मृदुंगाच्या गजरात विविध भजने गात गणरायाची मिरवणूक काढली. गणरायासह गौराईची मिरवणूक पाहण्यासाठी भक्त रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.रिक्षा, टेम्पो, ट्रक अशा वाहनांमधून गणरायाला निरोप दिला. कोळी आणि आगरी समाजातील महिलांनी एकाच प्रकारच्या साड्या परिधान केल्या होत्या, तर काही तरुण मुलांनी पारंपरिक पोशाख घातला होता. समुद्रकिनारी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल सजले होते. तेथे मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे दिसून आले. विसर्जनाला रात्री उशीर झाल्यास अलिबाग नगरपालिकेने समुद्रामध्ये विजेच्या दिव्यांची सोय केली होती. (प्रतिनिधी)५,९७१ गणरायांचे व २,५१७ गौरींचे विसर्जन४कर्जत : तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५,९७७ गणरायांचे व २,६०७ गौरींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवात पावसाने आनंदावर विरजन घातले असले तरी विसर्जनाच्या वेळी उघडीप दिल्याने गणपती व गौरींचे विसर्जन ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता.पनवेल : पाच दिवसाच्या बाप्पांना सोमवारी भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शनिवारी आगमन झालेल्या गौराईचेही सोमवारी विसर्जन करण्यात आले. तालुक्यात पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली, कामोठे, खारघर तसेच ग्रामीण भागात ठिकठीकाणच्या विसर्जन घाटावर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु होते. यावेळी पनवेल नगरपरिषद, सिडको, पोलिसांच्या वतीने विविध उपायोजन राबविण्यात आल्या होत्या. शहरी भागात १०९९४ घरगुती व सार्वजनिक बाप्पांना यावेळी निरोप देण्यात आला. ग्रामीण भागात देखील ही संख्या दोन हजारापेक्षा जास्त होती. पनवेल शहरात वडाळे तलाव, कृत्रिम तलाव, नवीन पनवेल मधील आदई तलाव, सुकापूर येथील गाढी नदीचे पात्र, खारघरमध्ये कोपरा तलाव, बेलपाडा विसर्जन घाट आदी ठिकाणी गणपती विसर्जित करण्यात आले.